India vs England T 20 Series | फिटनेस टेस्टमध्ये अनफिट, ‘या’ खेळाडूला टीम इंडियामधून डच्चू मिळण्याची शक्यता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर टी 20 सीरिज (India v England T 20 series) खेळवण्यात येणार आहे.

India vs England T 20 Series | फिटनेस टेस्टमध्ये अनफिट, 'या' खेळाडूला टीम इंडियामधून डच्चू मिळण्याची शक्यता
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 11:04 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England T 20 Series) यांच्यात कसोटी मालिकेनंतर 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. मात्र या टी 20 मालिकेआधी टीम इंडियासाठी एक धोक्याची घंटा आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळणारा लेग स्पिनर वरुण चक्रवर्थीची (Varun Chakravarthy)या टी 20 सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. पण वरुण हा फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे वरुणला संघातून वगळण्यात येऊ शकते. असं झाल्यास सलग दुसऱ्यांदा वरुणला आपल्या पदार्पणापासून दूर रहावे लागेल. (India v England T 20 series Varun chakravarthy fails in fitness test)

नक्की काय झालं?

क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, वरुण हा फिटनेस टेस्टमध्ये अनफीट असल्याचं दिसून आला. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात येत आहे. या टेस्टमध्ये बीसीसीआयने आखून दिलेले निकष पूर्ण केल्यावरच टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. खेळाडूंना 8 मिनिट 30 सेंकदात 2 किमी धावनं बंधनकारक आहे. यात पास झाल्यावरच तो खेळाडू हा खेळण्यास पात्र समजला जातो. वरुणला डच्चू मिळाल्यास हा त्याच्यासाठी मोठा झटका असेल.

याआधी दुखापतीमुळे माघार

वरुणला याआधी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेला मुकावे लागले होते. त्यामुळे वरुणच्या जागी टी नटराजनला संधी मिळाली होती. तेव्हा वरुणच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत IPL सुरु होण्याच्या अगोदरपासूनच होती. पण त्याने सर्जरी करण्याऐवजी वरुणने आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले होते. ही चूक वरुणला चांगलीच भोवणार असल्याचं दिसून येत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

संबंधित बातम्या :

IND vs AUS: एकही सामना न खेळता वरुण चक्रवर्ती भारतीय संघाबाहेर, वरुणच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

(India v England T 20 series Varun chakravarthy fails in fitness test)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.