Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN 1st Test : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11, हुकमी एक्क्याने वाढली ताकद

IND vs BAN Playing 11 : टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिल्या कसाटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंची निवड झाली आहे. मात्र प्लेइंग 11 मध्ये त्याला संधी मिळणं अवघड आहे. कोणाची अंतिम 11 मध्ये निवड होऊ शकते जाणून घ्या.

IND vs BAN 1st Test : पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11, हुकमी एक्क्याने वाढली ताकद
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 5:51 PM

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये येत्या 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेमधील पहिला कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. कसोटीमध्य टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंचे कमबॅक झाले आहे. पहिल्या कसोटीसाठी 16 खेळाडूंची निवड झाली आहे. बांगलादेशविरूद्ध प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागलं आहे. पुढील अकरा खेळडू प्लेइंग 11मध्ये असू शकतात. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि विराट कोहली यांची निवड होणार निश्चित मानली जात आहे. कॅप्टन रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यामुळे चौथ्या स्थानी विराट कोहलीला खेळावं लागणार आहे. त्यानंतर केएल राहुल आणि सर्फराज खान यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत याचे स्थान निश्चित मानलं जात आहे. पंत अपघातानंतर पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळणार आहे.

या खेळाडूंनंतर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन हे तिघेही ऑल राऊंडर खेळू शकतात. कारण हे तिघे मुख्य ऑल राऊंडर असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर होत असल्याने तीन स्पिनर खेळवले जाणार यात काही शंका नाही. त्यानंतर दोन जे गोलंदाज असतील ते जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे असू शकतात.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट नव्या दमाच्या खेळाडूंना बाहेर बसवू शकतात. सर्फराज खान, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, आकाशदीप आणि यश दयाल यांना बाहेर बसावं लागणार आहे. दोन कसोटी सामन्यांमधील फक्त एकाच कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी फार काही मोठे बदल न दिसण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (रक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.