IND vs AFG 3rd T20 | क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, फक्त इतक्या रूपयांमध्ये तिकिट, असं करा बुक

IND vs AFG 3rd T20- टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील शेवटचा सामना उद्या म्हणजेच बुधवारी पार पडणार आहे. या सामन्याची तिकिटे अगदी सोप्या पद्धतीने बुक करता येणार आहेत. तिकिट कसं बुक करता येईल याबाबत सविस्तरपणे सांगितलं आहे.

IND vs AFG 3rd T20 | क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, फक्त इतक्या रूपयांमध्ये तिकिट, असं करा बुक
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 4:18 PM

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने मालिका खिशात घातली आहे. शेवटचा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्यासाठी अफगाणिस्तान संघ आपली सर्व ताकद लावेल. तर टीम इंडिया सहजासहजी शेवटचा सामना सोडणार नाही. पाहुण्या अफगाणिस्तान संघाला रिकाम्या हाताने पाठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेलं. मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या टी-20 सामन्याचं तिकीट कसं बुक करायचं जाणून घ्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील शेवटचा टी-20 सामना बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियवर होणार आहे. या सामन्यांच्या तिकिटांचे दर समोर आले आहेत. या सामन्याचं तिकिट सर्वात महाग तिकीट 12 हजार रुपये, M4 P3 Annex साठी तिकिटांची किंमत 600 रुपये आहे. डी कॉर्पोरेट तिकिटांची किंमत 4,000 रुपये, ई एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत 5,500 रुपये, एन स्टँडची तिकिटे 6,500 रुपये आणि पी टेरेस तिकिटांची किंमत 10,000 रुपये आहे. पी कॉर्पोरेट तिकिटांची किंमत 12 हजार रुपये आहे.

तिकिट कसं बुक कराल?

पेटीए अॅपवर जा आणि सर्च बॉक्सवर Ind vs Afg 3रा T20 सामना शोधा. त्यावर क्लिक करत Buy Now करा. ड्रॉप डाउन मेनूमधील किंमतीनुसार तिकिटे फिल्टर करा. स्टेडियम फोटोमधून फ्लोअर तुम्हाला हवा तो पाहा आणि तुम्हाला हवं तितकी तिकिटे बुक करा. त्यानंतर खरेदी केल्यावर तुमचाा फोन नंबर टाका आणि पेमेंट करा.

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील शेवटचा सामना बुधवारी म्हणजेच  16 जानेवारील संध्याकाळी पार पडणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. बंगळुरूमधील स्टेडियम लहान असल्याने धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहेय.

टीम इंडिया संपूर्ण संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.