IND vs AFG 2nd T20 | अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असणार, 2 खेळाडूंना बसणार धक्का
IND vs AFG 2nd T-20 playing 11 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच रविवारी पार पडणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवत मालिका जिंकण्याचा इरादा टीम इंडियाचा असणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. कारण स्टार खेळाडू विराट कोहली कमबॅक करणार आहे.
टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये होणारा बदल म्हणजे गिल पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला होता. पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल हा ओपनिंगला येणार होता. पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. त्याच्याबाबत अजुनही कोणतं अपडेट समोर आलेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही ओपनिंगला रोहित शर्मा आणि शुबमन गिल असू शकतात. त्यानंतर विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. चौथ्या स्थानी आता शिवब दुबे याने आपली जागा पक्की केली आहे. पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतक करत विजयाचा शिल्पकार ठरला होता.
शिवम दुबे याच्यानंतर जितेश शर्मा पाचव्या स्थानी आहे. तर फिनिशर म्हणून युवा रिंकू सिंह याच्याकडे जबाबदारी असणार आहे. ऑल राऊंडर म्हणनू अक्षर पटेल . वॉशिंग्टन सुंदर याला परत एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मुकेश कुमार आणि अर्शदपी सिंह यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची भिस्त असणार आहे. पहिल्या सामन्यात रवी बिश्नोई याला चांगलाच मार बसला होता.
दरम्यान, यंदा टी-20 वर्ल्ड कप असून टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका असणार आहे. कारण आता इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर आयपीएल असणार आहे. आयपीएल झाली की वर्ल्ड कप असल्याने सर्व खेळाडूंची निवड ही आयपाएल कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
टीम इंडिया दुसऱ्या टी-20 संभाव्या प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर.