Ind vs SA, Playing XI : आज भारत विरुद्ध द.आफ्रिका सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन, संघात बदलाची शक्यता

टीम इंडियाच्या संघात फारसा बदल दिसत नाही. पहिल्या सामन्यात संघ चांगल्या लयीत दिसला.

Ind vs SA, Playing XI : आज भारत विरुद्ध द.आफ्रिका सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन, संघात बदलाची शक्यता
भारत विरुद्ध द.आफ्रिका सामनाImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 8:38 AM

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यात पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज कटक येथील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) काही बदल करायचे आहेत का? की विजयाच्या रथावर स्वार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात काही बदल होणार आहेत? याची उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे.  कारण जर भारतीय संघानं हा सामना जिंकला नाही तर संघ पुन्हा पिछाडीवर जाईल आणि यांचं मोठं नुकसान भारताला सहन करावं लागले. त्यामुळे आज क्रिकेट चाहत्यांचं भारताकडे विशेष लक्ष असणार आहे. आजच्या सामन्यात कोणता खेळाडू कसा खेळतो, कोण सर्वाधिक धावा काढतो, कोण किती चौकार आणि षटकार मारतो, याकडे  देखील क्रिकेटप्रेमीचं विशेष लक्ष असेल.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर अनेकदा सामन्यापूर्वी संघात मोठे बदल पहायला मिळतात. मात्र, टीम इंडियाच्या संघात फारसा बदल दिसत नाही. पहिल्या सामन्यात संघ चांगल्या लयीत दिसला. गोलंदाजांनी फटकेबाजी केली असली तरी नवा कर्णधार ऋषभ पंत आणि संघ व्यवस्थापन बदल करण्यापासून परावृत्त होईल. या सामन्यात गोलंदाजी खराब झाली. तर पुढच्या सामन्यात बदल शक्य आहे. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, परंतु ते सध्या बेंचवर दिसणार आहेत. यामुळे ऐनवेळी संघ काय बदल करतो, कोणताही खेळाडू समोर येतो, नेमके काय बदल होतात, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि आवेश खान

दक्षिण आफ्रिकेच्या संघात बदल होणार?

त्याचवेळी पहिला सामना जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर येथे बदल दिसून येतो. केशव महाराजांच्या जागी वेगवान गोलंदाज लुंगी एनगीडीला संधी मिळू शकते.पहिल्या सामन्यापूर्वी एडन मार्करामला कोरोनाची लागण झाली होती. अशा स्थितीत त्यांना संधी मिळणे सध्या तरी शक्य नाही. तिसऱ्या सामन्यापूर्वी मार्कराम फिट होऊ शकतो. पाहुण्या संघात बदल करण्यास वाव असल्याचं दिसतंय.

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (क), ड्वेन प्रिटोरियस, रसी व्हॅन डर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी आणि तबरीझ शम्सी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.