IND vs PAK : मानलं पोरी तुला! आख्या पाकिस्तानसमोर बोलली ‘मला बाबर नाहीतर विराट आवडतो’, पाहा Video
Pakistan Fan girl viral video : पाकिस्तानमधील एका तरूणीने उघडपणे विराट कोहलीला उघडपणे प्रपोजच केलं आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांसमोरच तिने मोठ्या हिमतीने मला बाबर नाहीतर विराट कोहली आवडत असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल आहे.
मुंबई : आशिया कप 2023 मधील तिसरा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये झाला. हा सामना पावसामुळे रद्द झालेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर स्वस्तात परतल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. मात्र ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी 138 धावांची भागीदारी करत डाव सावरलेला. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला, अशातच स्टेडिअममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या एका तरूणीने विराटला पाठिंबा दिला.
पाहा व्हिडीओ:-
“Chacha, padosiyon se pyaar karna buri baat toh nahi hai na.”
This Pakistani woman calmly shuts down a man when he taunts her for supporting Virat Kohli.
If an Indian woman had expressed sadness on Babar Azam getting out early, she’d be called an anti-national. pic.twitter.com/O4ZvKtKTAn
— Parth MN (@parthpunter) September 2, 2023
मी नाराज आहे कारण विराट कोहलीचं शतक झालेलं मला पाहायचं होतं. भारत-पाक सामना हा फक्त आणि फक्त विराट कोहलीला पाहण्यासाठी आले होते. माझा पाकिस्तान संघाला सपोर्ट आहेच पण मला विराट खूप आवडत असल्याचं तरूणी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. यावेळी तिच्या शेजारी असलेला पाकिस्तानचा चाहता तिला कोहीलीला का पाठिंबा देत आहेस? असं विचारतो. यावर ती तरूणी जे उत्तर देते त्याने सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत.
चाचा, शेजारच्यांवर प्रेम करणं काही वाईट गोष्ट नाही, असं ती पाकिस्तानच्या चाहत्याला सांगताना दिसत आहे. मोठी गोष्ट म्हणजे ती स्वत: पाकिस्तानची असून सर्वांसमोर मोठ्या हिमतीने आपल्याला विराट कोहली आवडत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. यामधून एक दिसून येतं की, चाहते खेळाडूंवर किती मोकळ्या मनाने प्रेम करतात.
दरम्यान, या तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. जगभरातील क्रिकेटचे चाहते तिने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करत आहेत.