IND vs AUS 1st ODI : हार्दिक पंड्याने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची Playing -11

| Updated on: Mar 17, 2023 | 1:14 PM

Ind vs Aus 1st ODI : टेस्ट सीरीजनंतर आता वनडे सीरीजची सुरुवात कशी होणार, याची उत्सुक्ता आहे. टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर सीरीज 2-1 ने जिंकली. टीम इंडियासमोर आता एकदिवसीय मालिकेच आव्हान आहे.

IND vs AUS 1st ODI : हार्दिक पंड्याने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची Playing -11
ind vs aus
Follow us on

Ind vs Aus 1st ODI : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची सीरीज सुरु होणार आहे. टीम इंडियाकडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने तयारीची चाचपणी करण्याची एक चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आज हार्दिक पंड्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करतोय. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर सामना होत आहे. काल मुंबईत ढगाळ वातावरण होतं. रात्रीच्या सुमारास पाऊस पडला. आज पावसाने बॅटिंग करु नये अशीच कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याचा हा पहिला वनडे सामना आहे. हार्दिक T20 मध्ये टीम इंडियाच नेतृत्व करतो. हार्दिक पंड्या पहिल्या वनडेसाठी काय प्लेइंग इलेव्हन निवडतो, त्याची सुद्धा उत्सुक्ता आहे.

कोणी जिंकला टॉस ?

कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकला असून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दव या मॅचमध्ये फॅक्टर ठरेल, असं हार्दिक पंड्याने म्हटलं आहे.

अशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावसकर सीरीजमध्ये पराभूत केलं. मात्र वनडे सीरिजमध्ये उभय संघातील आकडेवारी कोणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेऊया.

हेड टु हेड आकडेवारी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 143 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 53 वेळा ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. तर 10 सामन्यांचा काही निकाल लागला नाही.