IND vs AUS 1st T20 Live Streaming | 23 नोव्हेंबरपासून टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका, पहिला सामना कधी-कुठे?
India vs Australia 1st T20I Cricket Match Live Streaming | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या टी 20 मालिकेचा थरार अनुभवता येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे होणार, हे सर्वकाही जाणून घ्या.
मुंबई | टीम इंडियाचं पुन्हा एकदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियाचा धुव्वा उडवत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. आता टीम इंडिया वर्ल्ड कप गमावल्याचं दु:ख बाजूला करुन पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. टीम इंडिया आता आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने तयारील लागली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे होईल, ते आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना केव्हा?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना कुठे?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना हा डॉ वाय एस राजशेखरा रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्ट्णम इथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना टीव्हीवर कलर सिलेप्लेक्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवरही सामना पाहायला मिळेल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पहिला टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायला मिळेल.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.