IND vs AUS 1st Test : Ravindra jadeja च्या फिरकीची कमाल, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, VIDEO

| Updated on: Feb 09, 2023 | 2:07 PM

IND vs AUS 1st Test : खरंतर ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका भारताच्या स्पिन गोलंदाजांपासून आहे. पण रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि आर.अश्विन तिघांनी मिळून 22 ओव्हर्स टाकल्या. पण त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती.

IND vs AUS 1st Test : Ravindra jadeja च्या फिरकीची कमाल, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, VIDEO
ravindra jadeja ind vs aus
Follow us on

Ind vs Aus 1st Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजचा पहिला कसोटी सामना सुरु आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या ग्राऊंडवर ही मॅच सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला. पण त्यांना अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या टीम इंडियाच्या दोन बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाला झटके दिले. 2 रन्समध्ये ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावले. उस्मान ख्वाजा (1) आणि स्टीव्ह स्मिथ (1) रन्सवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाची टीम बॅकफूटवर होती. त्यावेळी मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी समर्थपणे टीम इंडियाची गोलंदाजी खेळून काढली.

स्पिनर्सपासून धोका

खरंतर ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका भारताच्या स्पिन गोलंदाजांपासून आहे. पण रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि आर.अश्विन तिघांनी मिळून 22 ओव्हर्स टाकल्या. पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही. लंचला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 76/2 होती.


जाडेजाने बॅकफूटवर ढकललं

लंचनंतर टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी आपली जादू दाखवली. रविंद्र जाडेजाने सलग तीन विकेट काढून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. लाबुशेन आणि स्मिथची जमलेली जोडी फोडली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. जाडेजाने सर्वप्रथम दमदार बॅटिंग करणाऱ्या लाबुशेनला भरतकरवी स्टम्पआऊट केलं. लाबुशेनच अर्धशतक अवघ्या एक रन्सने हुकलं. लाबुशेनने 123 चेंडूत 49 धावा करताना 8 चौकार मारले.

स्मिथला जाडेजाचा चेंडूच कळला नाही

त्यानंतर जाडेजाने पुढच्याच चेंडूवर मॅट रेनशॉला LBW आऊट केलं. जाडेजाने त्याला भोपाळाही फोडू दिला नाही. त्याने 36 व्या ओव्हरमध्ये या दोन्ही विकेट काढल्या. त्यानंतर त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या स्टीव्ह स्मिथला क्लीन बोल्ड केलं. स्मिथला जाडेजाचा हा चेंडूच कळला नाही. स्मिथने 107 चेंडूत 37 धावा करताना 7 चौकार मारले.

खेळपट्टी कशी आहे?

लंचला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 76/2 होती. काहीवेळाने 109/5 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती झाली. जाडेजाला नंतर अश्विनची साथ मिळाली. अश्विनने एलेक्स कॅरीला बोल्ड केलं. त्याने 33 चेंडूत 36 धावा केल्या. बातमी लिहिताना 57 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाची स्थिती 172/6 आहे. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी आता हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. नागपूरची खेळपट्टी सुद्धा फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे.