Ravindra jadeja : चेंडूशी छेडछाडीचा आरोप, जाडेजाने सिराजकडून कुठला पदार्थ हातावर घेतला? सत्य आलं समोर

| Updated on: Feb 10, 2023 | 9:31 AM

Ravindra jadeja : रवींद्र जाडेजावर बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरीजमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय.

Ravindra jadeja : चेंडूशी छेडछाडीचा आरोप, जाडेजाने सिराजकडून कुठला पदार्थ हातावर घेतला? सत्य आलं समोर
Ravindra jadeja
Image Credit source: Screengrab
Follow us on

India vs Australia, 1st Test : बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवासाची सुरुवातच वादाने झाली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने टेस्टच्या पहिल्याच दिवशी कमालीचा खेळ दाखवला. त्याने एकट्याने निम्मा ऑस्ट्रेलियन संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावर कांगारुंना नाचवलं. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची टीम अवघ्या 177 रन्समध्ये ऑलआऊट झाली. कांगारु टीमच्या पाठिराख्यांना हा धक्का पचवता आला नाही. त्यांनी रवींद्र जाडेजावर बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरीजमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा टोकाचे वाद झालेत. त्यामुळे सीरीज अधिक उत्कंठावर्धक झालीय.

मॅच रेफ्ररी Action मोडमध्ये

रवींद्र जाडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाल्यानंतर मॅच रेफ्ररी एंडी पाइक्रॉफ्ट Action मध्ये आले आहेत. त्यांनी एक मोठं पाऊल उचललं. भारत आणि ऑस्ट्रेलियात नागपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एंडी पाइक्रॉफ्ट मॅच रेफ्ररी आहेत. रवींद्र जाडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप झाला. त्यानंतर पाइक्रॉफ्ट यांनी कॅप्टन रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमच्या मॅनेजरला हजर होण्यास सांगितलं.

रोहितला दाखवला व्हिडिओ

इएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्ट्नुसार, मॅच रेफ्ररी एंडी पाइक्रॉफ्ट यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमच्या मॅनेजरला रवींद्र जाडेजाचा एक व्हिडिओ दाखवला. यात रवींद्र जाडेजा गोलंदाजी करण्याआधी टीममधील सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजजवळ जातो. त्याच्याकडून बामसारखी वस्तू घेऊन आपल्या हाताच्या बोटांना लावतो. मॅच रेफ्ररी एंडी पाइक्रॉफ्ट यांना या प्रकाराबद्दल रोहित आणि टीम मॅनेजमेंटला सूचित करायचं होतं. मॅच रेफ्ररीने रवींद्र जाडेजावर कुठलाही आरोप केलेला नाही.


हा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रवींद्र जाडेजाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. रवींद्र जाडेजा आपल्या हाताच्या बोटावर वेदनाक्षमन क्रीम लावत असल्याच भारतीय टीम मॅनेजमेंटने मॅच रेफ्ररी एंडी पाइक्रॉफ्ट यांना सांगितलं. ऑस्ट्रेलियन टीमने अजून याबद्दल मॅच रेफ्ररीकडे कुठलीही तक्रार केलेली नाही.

दोघांनी बंदीची शिक्षा देखील भोगली

ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रवींद्र जाडेजाच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. बोटाला होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती देणारी ही क्रीम होती, असं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या एका सूत्राने सांगितलं. ऑस्ट्रेलियन टीममधील डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दक्षिण आफ्रिकेत 2018 साली चेंडूशी छेडछाड केली होती. या प्रकरणात दोघांनी बंदीची शिक्षा देखील भोगली आहे.