Australia vs India, 1st Test, Day 2 HighLights : दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 62 धावांची आघाडी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे.
अॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia 2020) यांच्यात अॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा (18 डिसेंबर) खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 62 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाची 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 9 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का लागला. पृथ्वीने दुसऱ्या डावातही निराशा केली. पृथ्वी 4 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडून मयांक अग्रवाल आणि नाईट वॉचमॅन जसप्रीत बुमराह नाबाद परतले india vs australia 2020 1st test day 2 live cricket score updates online in marathi at adelaide oval लाईव्ह स्कोअरकार्ड
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. फिरकीपटूंसाठी प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर रवीचंद्रन आश्विनने पहिल्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार टीम पेनने सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या. तर मार्नस लाबुशानने 47 धावांची खेळी केली. मार्नसला टीम इंडियाकडून तब्बल 3 वेळा जीवनदान मिळालं. मात्र त्याला याचा फायदा घेता आला नाही.
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिल्या 2 विकेट्स मिळवून शानदार सुरुवात केली. यानंतर मोहम्मद शमीचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. टीम पेन आणि लाबुशानेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने धक्के दिले. टीम इंडियाकडून आश्विनने 4 विकेट्स घेतल्या. तर वेगवान गोलंदाज उमेश यादवने 3 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेटस मिळवल्या.
टीम इंडियाचा पहिला डाव
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर टीम इंडियाने झटपट 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. यामध्ये टीम इंडियाकडून पहिल्या डावात कर्णधार विराटने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर चेतेश्वर पुजाराने 43 तर अजिंक्य रहाणने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 6 विकेट 233 धावा होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 3 विकेट्स घेत स्टार्कला चांगली साथ दिली. तसेच जोश हेझलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.