AUS vs IND, 2nd Test 2nd Day Highlights | टीम इंडिया मजबूत स्थितीत, कर्णधार रहाणेचे शतक, दुसऱ्या दिवसखेर 82 धावांची आघाडी
टीम विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारताला धक्के द्यायला सुरुवात केली.
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसखेर 82 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा मैदानात खेळत होते. दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाचा 5 विकेट गमावून 277 धावा केल्या. (india vs australia 2020 2nd test day 2 live cricket score updates online in marathi at mcg) लाईव्ह स्कोअरकार्ड
STUMPS!
Play on Day 2 has been suspended with #TeamIndia on 277/5, lead by 82 runs.
Scorecard – https://t.co/lyjpjyeMX5 #AUSvIND pic.twitter.com/9OH5eDxUC0
— BCCI (@BCCI) December 27, 2020
शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी एकूण 61 धावांची भागीदारी केली. यानंतर युवा शुभमन गिल 45 धावावंर बाद बाद झाला. गिल मागोमाग चेतेश्वर पुजाराही 17 धावांवर माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.
मात्र अशा स्थितीत रहाणेने आपल्यातले नेतृत्वाचे कौशल्य दाखवले. रहाणेने हनुमा विहारीच्या मदतीने स्कोअरकार्ड हलता ठेवला. यानंतर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. यानंतर हनुमा विहारीही 21 धावांवर बाद झाला.
यानंतर रिषभ पंत मैदानात आला. रहाणे-पंत जोडीने पाचव्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. टीम इंडियाकडून चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पंत 29 धावा करुन तंबूत परतला. मात्र या भागीदारीला शतकी भागीदारीत बदलता आले नाही. पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजा मैदानात आला. या जोडीने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले.
कर्णधार रहाणे आणि जाडेजा या जोडीने दुसऱ्या दिवसखेर सहाव्या विकेटसाठी नाबाद 104 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रहाणेने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे तर मेलबर्नवरील दुसरे कसोटी शतक झळकावलं. या जोडीच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला 82 धावांची आघाडी घेता आली. दरम्यान तिसऱ्या दिवशी आणखी धावा करुन मोठी आघाडी मिळवण्याता मानस टीम इंडियाचा असेल.
A solid 100-run partnership comes up between @ajinkyarahane88 & @imjadeja.
India lead by 78 runs.
Live – https://t.co/HL6BBFdHmw #AUSvIND pic.twitter.com/dUusuSrqU8
— BCCI (@BCCI) December 27, 2020
दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाची धावसंख्या – 277-5 (91.3 Overs)
अजिंक्य रहाणे-104* , रवींद्र जाडेजा- 40*
टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन आणि जोश हेझलवूड