IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11?

| Updated on: Feb 17, 2023 | 9:22 AM

IND vs AUS 2nd Test : एका डावाने विजय मिळवून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दिल्ली कसोटीत हीच आघाडी 2-0 वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. त्याचवेळी नागपूर कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेणं, हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असेल.

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, कशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11?
ind vs aus
Follow us on

IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ही टेस्ट मॅच होणार आहे. टीम इंडियाने नागपूरच्या पहिल्या कसोटीत दणदणती विजय मिळवला होता. एका डावाने विजय मिळवून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दिल्ली कसोटीत हीच आघाडी 2-0 वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. त्याचवेळी नागपूर कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा बदला घेणं, हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असेल. टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारासाठी हा कसोटी सामना खास आहे. चेतेश्वर पुजाराच्या करिअरमधील हा 100 वा कसोटी सामना आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा भारताचा 13 वा खेळाडू आहे.

कोणी जिंकला टॉस?
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही पहिली बॅटिंग करणार. इथे चेंडू भरपूर टर्न होतो. एक चांगला सामना होईल” असं पॅट कमिन्स म्हणाला. हा कसोटी सामना टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारासाठी खास आहे. चेतेश्वर पुजाराच्या करिअरमधील हा 100 वा कसोटी सामना आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा भारताचा 13 वा खेळाडू आहे. चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 19 शतकं आणि 7000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो करिअरमधील 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी आतुर आहे.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 – पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन .

दिल्लीची विकेट कशी असेल?

फिरकी गोलंदाजी ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे. स्पिन गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियन फलंदाज गडबडतात. नागपूर कसोटीत त्यामुळेच त्यांची वाताहत झाली होती. आता दिल्ली कसोटीतही पीच फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत कॅप्टन रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले होते. दुसऱ्या कसोटीतही हेच गोलंदाज टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावू शकतात. कारण दिल्लीची खेळपट्टी सुद्धा फिरकीला अनुकूल ठरणार आहे.