IND vs AUS 2nd Test Result : मॅच फिरवणारे टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

| Updated on: Feb 19, 2023 | 3:00 PM

IND vs AUS 2nd Test Result : एकवेळ टीम इंडियाच्या हातून सामना निसटतोय असं वाटत होतं. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 263 धावा केल्या. त्यानंतर भारताने 262 रन्स केल्या.

IND vs AUS 2nd Test Result : मॅच फिरवणारे टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका
Team india
Image Credit source: bcci twitter
Follow us on

IND vs AUS 2nd Test : भारताने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने हरवलं. रोहित शर्माच्या टीमने सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. एकवेळ टीम इंडियाच्या हातून सामना निसटतोय असं वाटत होतं. पण रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, रोहित शर्मा, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने कठीण पीचवर कमाल केली. ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजय हिरावून आणला. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 263 धावा केल्या. त्यानंतर भारताने 262 रन्स केल्या. तिसऱ्यादिवशी जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा डाव 113 धावांच्या पुढे जाऊ दिला नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 115 धावांच लक्ष्य दिलं.

दुसऱ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमी, आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा चमकले. तिघांनी धारदार गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्या डावात फक्त 263 धावा केल्या. शमीने पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याचे 4 विकेट महत्त्वपूर्ण ठरले. अश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी 3-3 विकेट घेतले. पहिल्याडावात उस्मान ख्वाजा आणि पीटर हँडसकॉम्बने अर्धशतक फटकावलं.

दोघांची महत्त्वाची पार्ट्नरशिप

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये आपलं काम चोख बजावलं. पण टीम इंडियाच्या फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही. केएल राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा सर्व फ्लॉप ठरले. भारताचा निम्मा संघ 125 धावात तंबुत परतला होता. टीम अडचणीत होती. अशावेळी अक्षर पटेलने शानदार खेळ दाखवला. त्याने 74 धावा फटकावल्या. अश्विनसोबत मिळून महत्त्वाची पार्ट्नरशिप केली. अश्विनने 37 धावांच योगदान दिलं. या दोघांमुळे टीम इंडियाला पहिल्य़ा डावात 262 धावा करता आल्या. अक्षरच्या बॅटिंगने टीमचा उत्साह वाढवला व विजयाची आस निर्माण केली.

रविंद्र जाडेजाची कमाल

दुसऱ्याडावात ऑस्ट्रेलियावर रविंद्र जाडेजा भारी पडला. त्याने 42 धावात 7 विकेट काढल्या. पाहुण्या संघाच त्याने कंबरड मोडलं. जाडेजाला अश्विननने योग्य साथ दिली. त्याने 3 विकेट काढले. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम ऑलआऊट केली. त्यामुळे भारताला विजयासाठी 115 धावांच सोपं लक्ष्य मिळालं.

रोहितची रणनिती

या पीचवर विकेट झटपट जात होत्या. त्यामुळे टीम इंडिया कशी बॅटिंग करणार? याची चिंता होती. भारताला केएल राहुलच्या रुपात 6 रन्सवर पहिला झटका बसला. त्यानंतर रोहित शर्माने डाव सावरला. त्याने 20 चेंडूत 31 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी रोहितने स्पिनर्स बरोबर खास चर्चा केली व रणनिती बनवली. त्याचा परिणाम सामना सुरु झाल्यानंतर दिसला.