IND vs AUS : मिचेल स्टार्कने वापरला सिराजसारखा ‘टोटका’, यशस्वी जयस्वालने दिलं असं उत्तर Watch Video

मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी एक वेगळच चित्र पाहायला मिळालं. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चौथ्या विकेटसाठी झुंजवलं. तेव्हा स्टार्कने मोहम्मद सिराजचा टोटका वापरला. पण यशस्वी जयस्वालने ते परतवून लावलं.

IND vs AUS : मिचेल स्टार्कने वापरला सिराजसारखा 'टोटका', यशस्वी जयस्वालने दिलं असं उत्तर Watch Video
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 10:56 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा सामना निर्णायक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाने 105 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात 234 धावा केल्या आणि विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारतीय संघ गाठणार नाही हे क्रीडाप्रेमींना माहिती होतं. पण त्यातल्या त्यात सामना ड्रॉ करणं महत्त्वाचं होतं. हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या हातात आहे. भारताला सामना वाचवण्यासाठी कडवी झुंज देणं अपेक्षित आहे. एका बाजूने यशस्वी जयस्वाल किल्ला लढवत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला धडाधड विकेट पडत आहेत. पण एक स्थिती अशी होती की, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत जोडीने तग धरला होता. विकेटसाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलदांजांचा घाम निघाला होता. धावांची गती कमी असली तर षटकं संपण्याचा दोन्ही खेळाडूंचा मानस होता. त्यामुळे ही जोडी फोडण्याचा काही करून ऑस्ट्रेलियाचा मानस होता. टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्व प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नांना काही यश आलं नाही.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कने मोहम्मद सिराजचा टोटका वापरला. पण यशस्वी जयस्वालने लगेचच टोटका फिरवला. स्टार्कने दुसरं तिसरं काही नाही. विकेट पडत नसल्याने लक्ष विचलीत करण्यासाठी स्टंपवरील बेल्स इकडची तिकडे केली. असं करताना यशस्वी जयस्वालने पाहिलं आणि त्याने पुन्हा जैसे थे केल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

भारताने हा कसोटी सामना गमावल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीचं गणित खूपच किचकट होणार आहे. भारताला शेवटचा कसोटी सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. तसेच श्रीलंका ऑस्ट्रेलिया मालिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळवलं तर भारताला पुढचं तिकीट मिळू शकतं. पण पाचवा कसोटी सामनाही गमावला तर मात्र ऑस्ट्रेलियाचं अंतिम फेरीत स्थान पक्कं होईल. इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होईल.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.