IND vs AUS 5th T20 Highlights | टीम इंडियाचा 6 धावांनी विजय

| Updated on: Dec 03, 2023 | 10:56 PM

India vs Australia 5th T20I Highlights in Marathi : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका ही 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आहे. अर्शदीप सिंह आणि श्रेयस अय्यर हीजोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच इतर खेळाडूंचंही या विजयात योगदान राहिलं.

IND vs AUS 5th T20 Highlights | टीम इंडियाचा 6 धावांनी विजय

बंगळुरु | टीम इंडिया ने पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. तेव्हा अर्शदीप सिंह याने 3 धावा देत सामना फिरवला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.  या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलं होतं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Dec 2023 10:50 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी मात

    बंगळुरु | टीम इंडियाने पाचवी आणि अखेरची टी 20 मॅच जिंकली आहे. श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर कांगारुंना 154 धावांवरच रोखलं. अर्शदीप याने 20 व्या ओव्हरमध्ये 10 धावांचा शानदार बचाव केला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 4-1 ने जिंकली.

  • 03 Dec 2023 10:21 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | मॅथ्यु वेड आऊट, ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

    बंगळुरु | अर्शदीप सिंह याने निर्णायक क्षणी सामन्यातील 20 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलिया कॅप्टन मॅथ्यु वेड याला आऊट केलं. मॅथ्यु वेड 22 धावांवर कॅच आऊट झाला. श्रेयस अय्यर याने वेडचा कॅच घेतला.

  • 03 Dec 2023 10:05 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | मुकेश कुमारकडून कांगारुंना सलग 2 झटके

    बंगळुरु | मुकेश कुमार याने ऑस्ट्रेलियाला सलग 2 झटके दिले आहेत. मुकेशने ऋतुराज गायकवाड याच्या हाती मॅथ्यु शॉर्ट याला कॅच आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर बेन ड्वार्शुइस याला क्लिन बोल्ड केलं.

  • 03 Dec 2023 09:55 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | बेन मॅकडरमॉट आऊट, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का

    बंगळुरु | टीम इंडियाला मोठी विकेट मिळाली आहे. अर्धशतक ठोकून आक्रमक फलंदाजी करणाऱ्या बे याने न मॅकडरमॉट याला अर्शदीप सिंह याने रिंकू सिंह याच्या हाती कॅचआऊट केलं आहे. बेन मॅकडरमॉट 54 धावांची खेळी केली.

  • 03 Dec 2023 09:47 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम डेव्हिड आऊट, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

    बंगळुरु | ऑस्ट्रेलियाला चौथा झटका लागला आहे. टीम डेव्हिड 17 धावा करुन आऊट झाला.  अक्षर पटेल याने आपल्या बॉलिंगवर आवेश खान याच्या हाती डेव्हिडला कॅच आऊट केलं.

  • 03 Dec 2023 09:18 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाला तिसरं यश, एरॉन हार्डी आऊट

    बंगळुरु | टीम इंडियाला तिसरी विकेट मिळाली आहे. रवी बिश्नोई याने एरॉन हार्डी याला आऊट करत कांगारुंना तिसरा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाची 3 बाद 55 अशी स्थिती झाली आहे.

  • 03 Dec 2023 09:11 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर, ट्रेव्हिस हेड आऊट

    बंगळुरु | रवी बिश्नोई याने टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी दूर केली आहे.  रवीने ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड करत टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. हेड 28 धावा करुन आऊट झाला.

  • 03 Dec 2023 09:02 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

    बंगळुरु | मुकेश कुमार याने जोश फिलपी याला आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. मुकेशने फिलपीला 4 धावांवर बोल्ड केलं.

  • 03 Dec 2023 08:46 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी मैदानात, सामना सुरु

    बंगळुरु | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ट्रेव्हिस हेड आणि जोश फिलिपी ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 160 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 03 Dec 2023 08:30 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | श्रेयस अय्यर आऊट, टीम इंडियाला सहावा धक्का

    बंगळुरु | टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे.  श्रेयस अय्यर 53 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 03 Dec 2023 08:01 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, जितेश शर्मा माघारी

    बंगळुरु | टीम इंडियाला पाचवा झटका लागला आहे. जितेश शर्मा 16 बॉलमध्ये 24 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 5 बाद 97 असा झाला आहे.

  • 03 Dec 2023 07:43 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | फिनीशर रिंकू सिंह याची इनिंग फिनीश, टीम इंडियाला चौथा धक्का

    बंगळुरु | फिनीशर रिंकू सिंह आऊट झाला आहे. रिंकू 6 धावा करुन मैदानाबाहेर परतला.

  • 03 Dec 2023 07:33 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट

    बंगळुरु | टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. यशस्वी-ऋतुराज या सलामी जोडीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 5 धावा केल्या.

  • 03 Dec 2023 07:21 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाची सलामी जोडी माघारी

    बंगळुरु | टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावले आहेत. टीम इंडियाची सलामी जोडी माघारी परतली आहे.  यशस्वी जयस्वाल याच्यानंतर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. यशस्वी 21 आणि ऋतुराजने 10 धावा केल्या.

  • 03 Dec 2023 07:04 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Score | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरवात

    बंगळुरु | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे.  ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 03 Dec 2023 06:43 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Updates | टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

    ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

  • 03 Dec 2023 06:38 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Updates | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग

    बंगळुरु | पाचव्या आणि अंतिम टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन मॅथ्यु वेड याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहे.

  • 03 Dec 2023 06:05 PM (IST)

    IND vs AUS 5th T20 Live Updates | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आमनेसामने

    बंगळुरु | विराट कोहली याच्या सेंकड होम ग्राउंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध  ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवा होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

Published On - Dec 03,2023 6:03 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.