Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 10:21 AM

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (India vs Australia) 8 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाला या पराभवासह दुहेरी झटका लागला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ( Mohammad Shami) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. दुखापतीमुळे गोलंदाज इशांत शर्माला या मालिकेपासून वंचित रहावं लागलं. त्यात आता शमीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला हा मोठा झटका बसला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिलं आहे. India vs Australia Faster Bowler Mohammad Shami out of test series due to with fractured arm

पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस म्हणजेच 19 डिसेंबर. टीम इंडियाचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला. टीम इंडियाने अवघ्या 31 धावांवर 9 विकेट्स गमावल्या. त्यानंतर मोहम्मद शमी मैदानात आला. शमीने काही चेंडूंचा सामना केला. त्यानंतर शमीला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापत झाली. शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झालं. ही दुखापत इतकी गंभीर होती की, शमीला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आलं. परिणामी टीम इंडियाचा डाव 36-9 वर घोषित करावा लागला. या दुखापतीमुळे शमीला ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्या डावात गोलंदाजीही करता आली नाही.

उजव्या हाताला फ्रॅक्चर

शमीला सामन्यादरम्यान दुखापत झाली. यानंतर काही वेळाने त्याची आवश्यक ती चाचणी करण्यात आली. या चाचणीत शमीला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. यामुळे त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं. एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान बीसीसीआयकडून अजूनही शमीच्या दुखापतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

“शमीला या दुखापतीमुळे फार त्रास होतोय. त्याला साधी बॅट उचलण्यासाठीही त्रास जाणवतोय. वैद्यकीय तपासणीनंतरच शमीच्या दुखापतीबाबत अधिक समजेल”, अशी प्रतिक्रिया विराटने सामना संपल्यानंतर दिली होती.

शमीने ऑस्ट्रेलियाविरोधात मागील दौऱ्यात 2019-20 मध्ये शानदार कामगिरी केली होती. शमीने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत एकूण 16 विकेट्स घेतल्या. मात्र आता शमी नसणार आहे. त्यामुळे शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवच्या खांद्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे.

शमीच्या जागी कोणाला संधी?

शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे शमीच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र शमीच्या जागी थंगारासू नटराजनला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test, Day 3 : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा

India vs Australia Faster Bowler Mohammad Shami out of test series due to with fractured arm

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.