IND vs AUS Highlight 3rd ODI 2023 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 66 धावांनी दणदणीत विजय, भारताची मधल्या फळीची फलंदाजी फेल
IND vs AUS Highlight Score 3rd ODI 2023 : तिसरा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. आजच्या सामन्यात भारताचा प्रमुख संघ उतरला होता. त्यामुळे व्हाईटवॉश देईल अशी अपेक्षा होती. मात्र मालिका 2-1 ने संपुष्टात आली.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कांगारूंनी विजय मिळवला आहे. सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 352 धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात भारतीय संघाचा अपयश आलं, अवघ्या 286 धावांवर भारतीय संघ ऑल आऊट झाला. भारताने सामना गमावला असला तरी तीन सामन्यांच्या मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. या सामन्यात भारताच्या चार विकेट घेणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर शुबमन गिल याला मॅन ऑफ द सीरिज म्हणून गौरवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
LIVE Cricket Score & Updates
-
ind vs aus live score : ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय संघाला सर्वबाद 286 धावा करता आल्या. भारताची मधल्या आणि तळाची फलंदाजी अपयशी ठरली. त्यामुळे मोठं आव्हान गाठणं कठीण झालं. आता भारताची वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कसोटी लागणार आहे.
-
ind vs aus live score : भारतीय संघाला नववा झटका, रवींद्र जडेजा आऊट
भारताला रवींद्र जडेजाच्या रुपाने नववा झटका बसला आहे. संघाच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.
-
-
ind vs aus live score : जसप्रीत बुमराह आऊट
भारताची आठवी विकेट गेली असून आता मैदानात रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज आहेत. भारतासाठी आता विजय मिळवणं अशक्यच झालं आहे.
-
ind vs aus : सहावी दांडी गूल
भारताला सहावा झटका बसला असून श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. या विकेटमुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मैदानात जडेजा आणि कुलदीप यादव उतरला आहे.
-
IND VS AUS 3rd ODI : विराट कोहली आऊट
भारताची तिसरी विकेट गेली असून 56 धावांवर कोहली बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहलीचा जाग्यावरच झेल उडाला. कोहलीचा हवेत उडालेला झेल स्मिथने पकडला.
-
-
ind vs aus live score : रोहित शर्मा आऊट
भारताची दुसरी विकेट पडली असून कर्णधार रोहित शर्मा (81 धावा) शतकाच्या जवळ असताना आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने त्याच्याच चेंडूवर एका हाताने रोहितचा अप्रतिम झेल घेतला.
-
ind vs aus live score : भारतीय संघाला पहिला झटका
भारताची पहिली विकेट पडली. 11 व्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेलने सुंदरला आऊट केलं. सुंदरने मॅक्सवेलच्या चेंडूला लाँग ऑनला मारण्याचा प्रयत्नता तो कॅच आऊट झाला.
-
ind vs aus live score : रोहितचं अर्धशतक
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये अवघ्या 32 चेंडूत 50 धावा करत मजबूत सलामी करून दिली आहे. रोहित शर्मा आणि सुंदर मैदानाता असून भारताच्या 10 ओव्हरमध्ये 72 धावा झाल्या आहेत.
-
ind vs aus live score : भारताची मजबूत सुरूवात
रोहित शर्मा आणि सुंदर यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारताने पहिल्या 9 षटकात एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या आहेत. रोहित नाबाद 48 धावांवर खेळत आहे.
-
ind vs aus 3rd odi live update : वॉशिंग्टन सुंदर सलामीला
रोहित शर्मासोबत आज ओपनिंगला वॉशिंग्टन सुंदर आला आहे. शुबमन गिल याच्या उपस्थितीत सुंदरला खेळण्याची संधी मिळाली आहे. भारताला जिंकण्यासाठी 353 धावांचं आाव्हान ऑस्ट्रेलियाने दिलं आहे.
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या आहेत. तसेच विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
ind vs aus 3rd odi live score : लाबुशेन 72 धावांवर बाद
मार्नस लाबुशेन 72 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने तिसरा गडी बाद केला.
-
ind vs aus 3rd odi live score : लाबुशेनची अर्धशतकी खेळी
मार्नस लाबुशेननं अर्धशतकी खेळी केली. 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, कुलदीप यादवला मिळालं दुसरं यश
ऑस्ट्रेलियाला कॅमरोन ग्रीनच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. कुलदीप यादव याला दुसरं यश मिळालं आहे.
-
ind vs aus 3rd odi live score : बुमराहचा ऑस्ट्रेलिया दे धक्का, मॅक्सवेलला केलं बाद
जसप्रीत बुमराह याने ग्लेन मॅक्सवेलला तंबूचा रस्ता दाखवला. मॅक्सवेलला अवघ्या 5 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं.
3RD ODI. WICKET! 38.6: Glenn Maxwell 5(7) b Jasprit Bumrah, Australia 281/5 https://t.co/H0AW9UXI5Y #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2023
-
ind vs aus 3rd odi live score : जसप्रीत बुमराहला पहिलं यश, कॅरीला केलं बाद
जसप्रीत बुमराह याला या सामन्यात पहिलं यश मिळालं आहे. त्याने कॅरीला बाद करत तंबूत पाठवलं आहे.
3RD ODI. WICKET! 36.6: Alex Carey 11(19) ct Virat Kohli b Jasprit Bumrah, Australia 267/4 https://t.co/H0AW9UXI5Y #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2023
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, स्टिव्ह स्मिथला सिराजने दाखवला तंबूचा रस्ता
स्टीव्ह स्मिथ 61 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला पायचीत करत तंबूत पाठवलं.
3RD ODI. WICKET! 31.3: Steven Smith 74(61) lbw Mohammed Siraj, Australia 242/3 https://t.co/H0AW9UXI5Y #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2023
-
ind vs aus 3rd odi live score : मिचेल मार्श कुलदीप यादवच्या फिरकीत अडकला
मिचेल मार्श याचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. कुलदीप यादव याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि बाद झाला.
3RD ODI. WICKET! 27.6: Mitchell Marsh 96(84) ct Prasidh Krishna b Kuldeep Yadav, Australia 215/2 https://t.co/H0AW9UXI5Y #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 27, 2023
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्या अर्धशतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाने 200 धावांचा पल्ला गाठला आहे. भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड सुरु आहे.
-
ind vs aus 3rd odi live score : स्टीव्ह स्मिथचं दमदार अर्धशतक
स्टिव्ह स्मिथ याने दमदार अर्धशतक झळकावलं आहे. तसेच मिचेल मार्शसोबत दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
-
ind vs aus 3rd odi live score : मिचेल मार्श याचं अर्धशतक
मिचेल मार्श याने 45 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाच्या 15 षटकात 1 गडी बाद 120 धावा
ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्मिथने चांगली कामगिरी केली.
-
ind vs aus 3rd odi live score : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेविड वॉर्नर बाद
ऑस्ट्रेलियाला वॉर्नरच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. डेविड वॉर्नर 56 धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
-
ind vs aus 3rd odi live score : सामन्याला सुरूवात
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. जसप्रीत बुमराह भारतासाठी पहिलेॉी ओव्हर टाकत आहे.
-
ind vs aus live update : ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचं कमबॅक
पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पुनरागमन झाले आहे. तन्वीर संघा हा भारतीय वनडे पदार्पण करत आहे.
-
ind vs aus live update : रोहित, विराट यांचं आगमन
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यामध्ये भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी संघात कमबॅक केलं आहे.
-
ind vs aus live update : भारत-ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा
-
ind vs aus live update : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांगारूंनी संघात चार बदल केले आहेत.
-
Election 2024 : भाजपचा टिकीट वाटपाचा फॉर्मुला ठरला!
लोकसभेच्या कामगिरीवरून विधानसभेचं तिकीट मिळणार असल्याचा फॉर्मुला भाजप यंदा तिकीट वाटप करताना वापरणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे राज्यातील भाजप आमदारांना असे स्पष्ट संकेत आहेत.
-
ind vs aus live update : टॉस टाईम
सामना सुरू व्हायला काही मिनिटे बाकी आहेत. दुपारी एक वाजता टॉस होणार असून टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम बॅटींगचा निर्णय घेऊ शकतो.
-
ind vs aus live update : हेड टू हेड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे होत आहे. राजकोटच्या माधव राव सिंधिया स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 6 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत.
-
IND vs AUS Live Update : पिच रिपोर्ट
आजच्या सामन्यातील पिच हे फलंदाजीसाठी पूरक असून पावसाचं सावटही सामन्यावर नसणार आहे. आजही 300 पेक्षा जास्त धावा निघतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published On - Sep 27,2023 12:38 PM