IND vs AUS Head To Head | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, दोघांपैकी कोण वरचढ?

india vs australia head to head records | आशिया कप जिंकल्याने टीम इंडियाचा विश्वास दुप्पट आहे. त्यामुळे टीम इंडिया अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज आहे.

IND vs AUS Head To Head | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, दोघांपैकी कोण वरचढ?
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 11:41 PM

मोहाली | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 मॅचच्या वनडे सीरिजला शुक्रवार 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने जोरदार सराव केला आहे. काही दिवसांनी सुरु होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर निवड समिती आणि क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियाची या वर्षातील ही दुसरी एकदिवसीय मालिका आहे. त्याआधी मार्च 2023 मध्ये झालेली एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली होती.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलियात भारी कोण?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही तोडीसतोड संघ आहेत. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 146 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापेक्षा 30 सामने जास्त जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने 146 पैकी 84 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 54 वेळा पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ आहे. मात्र टीम इंडियाची गेल्या काही मालिकेतील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियासमोर तगडं आव्हान असणार आहे.

पहिल्या सामन्याबाबत थोडक्यात

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पार पडणार आहे. पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे. तर केएल राहुल टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.