IND vs AUS Turning Point : बापूचा नादच खुळा, बाऊड्री लाईनवर उंच उडी मारत एका हातात खतरनाक कॅच
IND vs AUS : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या सामन्यात अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला. अक्षरने एका हातात झेल घेतला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्यात स्टार खेळाडू अक्षर पटेल याने अफलातून कॅच घेतला. टीम इंडियाने हा सामना 24 धावांनी जिंकला. कांगारू 206 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड याने ७६ धावांची कडवी झुंज दिली. या सा्मन्यात अनेक टर्निंग पॉईंट ठरले पण अक्षरपटेल याने घेतलेला झेलने सामन्यात भारताच्या बाजूने पारडं झुकलं. अक्षरने सुपरमॅनसारखा हवेत उंच उडी मारत कॅच पकडला, त्याच्या कॅचमुळे एक बाजूने झुकलेला सामना टीम इंडियाच्या पारड्यात झुकवला. अक्षर पटेलने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ:-
𝐀𝐗𝐀𝐑, 𝘮𝘶𝘫𝘩𝘦 𝘭𝘰𝘨 𝙎𝙪𝙥𝙚𝙧𝙢𝙖𝙣 𝘬𝘦𝘩𝘵𝘦 𝘩𝘢𝘪𝘯 💥
An incredible catch by #AxarPatel to dismiss the Aussie skipper and #KuldeepYadav provides a much-needed breakthrough in the #𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐑𝐢𝐯𝐚𝐥𝐫𝐲 💪🏽
𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝟖 👉 #AUSvIND | LIVE NOW |… pic.twitter.com/OOC5OkCymx
— Star Sports (@StarSportsIndia) June 24, 2024
टीम इंडियाची बॅटींग
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 204 धावांचा डोंगर उभारलाय. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. अवघ्या 41 बॉलध्ये रोहितने 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 92 धावा केला. रोहितने अवघ्या 19 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित वेगवान शतक करणारा पहिला खेळाडू ठरलाय. तर सुर्यकुमार यादवने 16 बॉलमध्ये (3 चौकार, 2 षटकार) 31 धावा, हार्दिक पंड्याने नाबाद 27 धावा करत टीम इंडियाला 200 धावांच्या पार नेलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.