IND vs AUS Test : टेस्ट सीरीजमध्ये पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नागपूर पाठोपाठ दिल्लीत कसोटीत टीम इंडियाने तीन दिवसात विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी कशी खेळायची? हे ऑस्ट्रेलिया समोरच मोठं आव्हान आहे. त्यात त्यांच्या खेळाडूंना दुखापती होतायत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर डेविड वॉर्नर कसोटी मालिकेतून बाहेर गेलाय. तो उर्वरित कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. डेविड वॉर्नर उर्वरित टेस्ट सीरीजमध्ये खेळणार नसल्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती.
हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला
दोन टेस्ट मॅचमधील खराब कामगिरी आणि दुखापतीने डेविड वॉर्नरला मायदेशी परतण्यास भाग पाडलय. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये वॉर्नरच्या हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला होता. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नाही.
वनडे सीरीज खेळणार?
डेविड वॉर्नरला कनकशनचा त्रास झाला होता. त्याशिवाय हाताला हेयरलाइन फ्रॅक्चर झालं होतं. आता दुखापतीमुळे तो उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियात उपचार घेऊन वनडे सीरीजसाठी भारतामध्ये परतू शकतो.
सीरीजमध्ये वॉर्नरची कामगिरी कशी?
डेविड वॉर्नरसाठी ही टेस्ट सीरीज खूपच खराब ठरली. त्याने टेस्ट मॅचच्या 3 इनिंगमध्ये 26 धावा केल्या. त्याची सरासरी 10 पेक्षा पण कमी होती. वॉर्नरच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतय. डेविड वॉर्नरला वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्थान मिळालय.
वनडे सीरीज कधीपासून सुरु होणार
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरीज 17 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई, विशाखापट्टनम आणि चेन्नईमध्ये वनडे सामने खेळले जाणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1 मार्चपासून इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाईल.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात परतणार
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सही मायदेशी परतणार आहे. कौटुंबिक कारणामुळे तो मायदेशी जाणार आहे. कमिन्सच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहे. म्हणून तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण एक मार्चपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी तो भारतात दाखल होईल.