IND vs AUS Test : आपल्याच माणसांना रोहित-विराटवर नाही राहिला विश्वास, त्यामागे कारणही तसंच

| Updated on: Feb 05, 2023 | 11:44 AM

IND vs AUS Test : मागच्यावर्षी मीरपूरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मेहदी हसन मिराज, शाकीब अल हसन आणि ताईजुल इस्लाम यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज ढेपाळले होते.

IND vs AUS Test : आपल्याच माणसांना रोहित-विराटवर नाही राहिला विश्वास, त्यामागे कारणही तसंच
Rohit-Virat
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 9 फेब्रुवारीपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. यावेळी पीच कसा असेल? असा मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, टेस्ट मॅच पाच दिवस चालेल, अशा पीचची भारतीय टीमने पीच क्यूरेटर्सकडे मागणी केलीय. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये स्पिन फ्रेंडली विकेट बनवल्यास, भारतीय बॅटिंग लाइन-अपच्या अडचणी वाढू शकतात, असं माजी निवडकर्ते आणि एक्सपर्ट्सच मत आहे. काही माजी क्रिकेटपटूंना रोहित-विराट आणि पुजारा सारख्या बॅट्समनवरही विश्वास उरलेला नाही. पीच स्पिन फ्रेंडली बनवल्यास, त्यात भारतीय फलंदाजच फसू शकतात, असं माजी लेफ्ट आर्म स्पिनर आणि कमेंटेटर मुरली कार्तिक म्हणाला.

त्यावेळी अश्विन-अय्यरमुळे पुनरागमन

एकवेळ अशी होती, जेव्हा भारतीय फलंदाज स्पिन गोलंदाजी खेळण्यात माहिर समजले जायचे. पण अलीकडच्या काही वर्षात दिसलय, टीम इंडिया वेगवान गोलंदाजी सहजतेने खेळते. पण स्पिन गोलंदाजी खेळताना अडचणीत येते. मागच्या दोन-तीन वर्षात टीम इंडियाचा कुठला फलंदाज उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर त्याची बेस्ट इनिंग खेळलाय?. यात रोहित शर्माची 161`धावाची इनिंग आहे. चेपॉकच्या खराब विकेटवर रोहितने या धावा केल्या होत्या. मागच्यावर्षी मीरपूरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मेहदी हसन मिराज, शाकीब अल हसन आणि ताईजुल इस्लाम यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज ढेपाळले होते. त्यावेळी रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाने कसोटीत पुनरागमन केलं.

भारतीय फलंदाजच जाळ्यात अडकू शकतात

“पाटा विकेटवर स्पिन गोलंदाजी खेळण्यात कुठली समस्या नाहीय. आपल्याला हे मान्य कराव लागेल की, आपले बॅट्समन उसळी घेणाऱ्या विकेटवर स्पिन गोलंदाजी खेळताना अडखळतात. विकेट कशी असेल हे, मी सांगू शकत नाही. पण उसळी घेणाऱ्या विकेट्सवर डाव उलटा पडू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्पिन गोलंदाजांवर हुकूमत गाजवणारे बॅट्समन नाहीयत” असं मुरली कार्तिक पीटीआयशी बोलताना म्हणाला.

विराट-पुजाराचा रेकॉर्ड काय?

मागच्यावर्षभरात टीम इंडियाचे दोन मोठे बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांचं स्पिन गोलंदाजी विरोधात प्रदर्शन सरासरी राहिलं आहे. त्यामुळे मुरली कार्तिकची भिती कुठेना कुठे योग्य वाटते. 2021 साली आशियाई भूमीवर विराट कोहली 15 डावात 11 वेळा स्पिनर्स विरुद्ध आऊट झालाय. पुजाराही वर्ष 2021 मध्ये 14 इनिंगमध्ये 10 वेळा स्पिन गोलंदाजी खेळताना बाद झालाय. ऑस्ट्रेलियाकडे एश्टन एकरच्या रुपात चांगला लेफ्ट आर्म स्पिनर आहे. त्यामुळे स्पिन गोलंदाजी खेळताना टीम इंडिया जास्त अडचणीत येऊ शकते.