IND vs AUS W T20 Semi Final Score | ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय, टीम इंडिया वर्ल्ड कपमधून ‘आऊट’
India vs Australia Women's T20 World Cup 2023 semi-final Live Socre Updates | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वूमन्स वर्ल्ड कपमधील पहिला सेमीफायनलचं आयोजन हे केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं होतं.
न्यूलँड्स | आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कपमधील पहिल्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 धावाच करता आल्या.ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. शफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. 9 या धावसंख्येवर आता पायचीत होत तंबूत परतली. त्यानंतर स्मृती मंधाना देखील अवघ्या दोन धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका भाटिका धावचीत झाल्याने तिच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला.
चौथ्या विकेट्ससाठी जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरनं डाव सावरला. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिक्स चुकीचा फटका 43 या धावसंख्येवर परतली. त्यानंतर हरमनप्रीत कौरची खेळी सुरुच होती. पण धावचीत झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा मावळल्या. दीप्ती शर्मानं डाव सावरला खरा पण तिलाही स्नेह राण , राधा यादव यांची साथ मिळाली नाही. अखेर हा सामना भारताने 5 धावांनी गमावला.
LIVE NEWS & UPDATES
-
India vs Australia W’s T20 Live Score टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये
Ind vs Aus w semi final Live Score | टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये 5 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही सातवी वेळ ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या.
-
Ind vs Aus w semi final Live Score : भारतीय संघाला चौथा झटका
जेमिमा 43 धावांवर बाद, भारतावर पून्हा दबाव, रिचा घोष मैदानात
-
-
Ind vs Aus : हरमनप्रीत आणि जेमिमाने डाव सावरला
भारताच्या 28 धावांवर 3 विकेट्स गेल्या असताना कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. भारताला आता 60 बॉलमध्ये 80 धावांची गरज आहे.
-
India vs Australia W’s T20 Live Score | टीम इंडियाची ओपनिंग जोडी तंबूत, शफालीनंत स्मृती मंधाना माघारी
Ind vs Aus w semi final Live Score | टीम इंडियाची ओपनिंग जोडी आऊट झाली आहे. शफाली वर्मानंतर सांगलीकर स्मृती मंधाना बाद झाली आहे. स्मृतीने अवघ्या 2 धावा केल्या.
-
India vs Australia W’s T20 Live Score | टीम इंडियाला पहिला झटका, शफाली वर्मा माघारी
Ind vs Aus w semi final Live Score | टीम इंडियाची अतिशय निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाची लेडी सेहवाग अशी ओळख असलेली शफाली वर्मा स्वसतात आऊट झाली आहे. शफालीने ९ धावा केल्या.
-
-
India vs Australia W’s T20 Live Score | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, स्मृती-शफाली मैदानात
Ind vs Aus w semi final Live Score | टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाची सलामी जोडी शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना 173 धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरले आहेत.
-
India vs Australia W’s T20 Live Score | मूनीचं अर्धशतक, लॅनिंगचा तडाखा, टीम इंडियाला फायनलसाठी 173 धावांचं आव्हान
Ind vs Aus w semi final Live Score | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. कांगारुंकडून बेथ मूनी हीने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.कॅप्टन लॅनिंगने नाबाद 49 धावा केल्या. ओपनर हिलीने 25 रन्स ठोकल्या. तर गार्डनरने 31 धावांच योगदान दिलं. ग्रेस हॅरीस 7 धावांवर बाद झाली. टीम इंडियाकडून शिखा पांडे हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर राधा यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
-
India vs Australia W’s T20 Live Score | ऑस्ट्रेलियाला झटपट 2 धक्के
Ind vs Aus w semi final Live Score | ऑस्ट्रेलियाने शेवटच्या काही षटकांमध्ये झटपट तिसरी आणि चौथी विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाला अशले गार्डनरच्या रुपात तिसरा झटका बसला. तर शिखा पांडे हीने ग्रेस हॅरीसला आऊट करत चौथा धक्का दिला.
-
India vs Australia W’s T20 Live Score | ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
India vs Australia W’s T20 Live Score | ऑस्ट्रेलियाने मोठी विकेट गमावली आहे. बेथ मूनी 54 धावा करुन माघारी परतली. मूनीने झंझावाती अर्धशतकी खेळी केली. शिखा पांडे हीने शफाली वर्मा हीच्या हाती मूनीला कॅचआऊट केलं.
-
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
WIND vs WAUS Semi Final Live Updates | ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली आहे. अलिसा हिली 25 धावा करुन माघारी परतली आहे. राधा यादव हीच्या बॉलिंगवर अलिसा हिला रिचा घोषने स्टंपिंग आऊट केलं.
-
IND vs AUS Live Score | ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 31 धावा केल्या आहेत. अलिसा आणि बेथ सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
-
INDvsAUS Live Updates | सामन्याआधी हे रेकॉर्ड जाणून घ्या
अवघ्या काही मिनिटांनी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी उभयसंघातील महत्त्वाचे रेकॉर्ड्स जाणून घ्या
INDvsAUS, Semi Final | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने
-
अशी आहे ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
Australia Playing 11 | मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
Meg wins the toss and we're having a bat first in the #T20WorldCup semi-final!
Alyssa Healy and Jess Jonassen come into the XI.
Watch LIVE on Kayo Freebies: https://t.co/VwaYeYwBVG pic.twitter.com/IMhBo7ulUn
— Australian Women's Cricket Team ? (@AusWomenCricket) February 23, 2023
-
INDvsAUS Live Updates | टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
INDvsAUS, Team India Playing 11 | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
A look at our Playing XI for the game ??#INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/rKzk51MENs
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
-
INDvsAUS Live Updates | ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय
INDvsAUS Live Updates | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल सामन्याला 6 वाजून 30 सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याचं दोन्ही संघाचं लक्ष्य आहे. असं असलं तरी मागच्या काही सामन्यांचा आलेख पाहिला तर ऑस्ट्रेलियाचा पारडं जड दिसत आहे. पण भारतीय महिला संघानं या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
Australia have won the toss and elect to bat first in the semi-final at the #T20WorldCup
Live – https://t.co/fVVsNjFbjU #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/OG8TTTBvaM
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
-
India vs Australia W’s T20 Live Updates | टॉसचा बॉस कोण?
India vs Australia W’s T20 Live | अवघ्या काही मिनिटात टॉस उडवला जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता टॉस होणार आहे. टॉसआधी टीम इंडियाकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या दोघींनी खेळपट्टीची पाहणी केली.
हरमनप्रीतकडून खेळपट्टीची पाहणी
We're 10 minutes away from the toss ?#T20WorldCup | #AUSvIND | #TurnItUp pic.twitter.com/65rjWBPK2Q
— ICC (@ICC) February 23, 2023
-
WINDvsWAUS | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Icc W T20 World Cup Semi Final 1 | आयसीसी वूमन्स वर्ल्ड कपमधील पहिला सेमीफायनल सामन्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
Published On - Feb 23,2023 5:34 PM