IND vs AUS : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, 24 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड कपच्या पहिला सामन्यात…

IND vs AUS : वर्ल्ड कपमधील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही तगडे संघ असल्याने सामना प्रेक्षणीय होणार यात काही शंका नाही. मात्र पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या कांगारू संघाचा रेकॉर्ड पाहता भारताला धडकी भरवणारा आहे.

IND vs AUS : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, 24 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड कपच्या पहिला सामन्यात...
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 10:20 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. वर्ल्ड कपमधील दोन्ही संघांचा पहिला सामना आहे. चेन्नईमधील चेपॉक स्टेडिअममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. पाचवेळा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरणारा ऑस्ट्रेलिया संघ आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये वेगळ्याच फॉर्ममध्ये असतो. आता झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड पाहता भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरणारी बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षांचा रेकॉर्ड

1996 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कपमधील पहिला सामना गमावला होता. त्यानतंर कागांरूंनी आतापर्यंत एकदाही पहिल्या सामन्यात पराभव पत्करला नाही. 1996 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला श्रीलंकेने पराभूत केलं होतं. त्यानंतर कांगारूंनी 1999, 2003, 2007, 2011, 2015 आणि 2019 या वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना गमावला नाही. डबल हॅट्रिक म्हणजे सलग सहा सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

भारतासाठी हा रेकॉर्ड मोडणं फार काही अवघड नाही पण हेसुद्धा तितकंच खरं आहे की तेवढं सहजसोप नसणार आहे. भारताने वन डे मालिकेत सलग दोन विजय मिळवले खरे पण वर्ल्ड कपमध्ये कांगारू वेगळ्याच फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. भारताच्या या रेकॉर्डवर नजर मारली तर भारतानेही गेल्या तीन वर्ल्ड कप मध्ये पहिल्या सामन्यात विजयाने श्रीगणेशा केला आहे. 2011 मध्ये बांगलादेश, 2015 मध्ये 2015 मध्ये पाकिस्तान आणि 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. 2007 मध्ये पहिला सामना भारतीय संघाने गमावला होता.

ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.