भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर आता टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं लक्ष हे बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप देण्याकडे असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. तर आता टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा हा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अशात या सामन्यात कोण यशस्वी ठरतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.
इंडिया-बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना टीव्हीवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
इंडिया-बांगलादेश तिसरा आणि अंतिम सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.