भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी, टीम इंडियाच्या वाटेला दोन कसोटीत आलं असं काही

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण कोणत्या संघाचं वजन अधिक आहे ते जाणून घेऊयात

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी, टीम इंडियाच्या वाटेला दोन कसोटीत आलं असं काही
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 7:44 PM

कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांग्लादेश हे दोन आशियाई संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ सहा महिन्यानंतर कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतील विजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित सोडवणार आहे. पराभव आणि ड्रॉ सामना विजयी टक्केवारीवर परिणाम करणार आहे.भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ कसोटी क्रिकेटमध्ये 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताचं वजन अधिक आहे. भारताने 11 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या दोन सामन्यात बांगलादेशने भारताला चांगलंच झुंजवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखनं महागात पडू शकतं. भारत आणि बांग्लादेश यांच्यात मायदेशात आतापर्यंत एक कसोटी मालिका पार पडली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 3-0 ने जिंकली होती. ही मालिका 2017 साली भारतात पार पडली होती. त्यानंतर भारत बांग्लादेश कसोटी सामना भारतात झालेला नाही.

मागच्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला तर बांगलादेशला खूप वाईट पद्धतीने टीम इंडियाने पराभूत केलं आहे. दोन्ही सामने भारताने एका डावाने जिंकले आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मागील पाच सामन्यांचं विश्लेषण जाणून घ्या

  • फेब्रुवारी 9-13, 2017 मध्ये सामना पार पडला. भारत (687/6 डाव घोषित आणि 159/4 डाव घोषित) बांगलादेश (388 आणि 250). भारताने 208 धावांनी पराभव केला.
  • नोव्हेंबर 14-16, 2019 मध्ये सामना पार पडला. भारत (493/6 डाव घोषित) बांग्लादेश (150 आणि 213) भारताने एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला.
  • नोव्हेंबर 22-24, 2019 मध्ये सामना पार पडला. भारत (347/9 डाव घोषित) बांगलादेश(106 आणि 195. भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला.
  • डिसेंबर 14-18, 2022 मध्ये सामना पार पडला. भारत (404 आणि 258/2 डाव घोषित) बांगलादेश (150 आणि 324). बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला.
  • डिसेंबर 22-26, 2022 सामना पार पडला. भारत (314 आणि 145/7) बांगलादेश (227 आणि 231). बांगलादेशचा3 गडी राखून पराभव केला.

पहिला कसोटी सामना 1934 मध्ये चेन्नईत झाला होता. तेव्हापासून चेन्नईमध्ये एकूण 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 15 कसोटी सामने जिंकले आणि 11 सामने अनिर्णित राहिले. उर्वरित 7 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.