Video: ऋषभ पंतला Live सामन्यात मागावी लागली माफी, चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या नेमकं काय घडलं?

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा संघ 149 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडे 227 धावांची आघाडी आहे. असं असताना ऋषभ पंतवर लाईव्ह सामन्यात माफी मागण्याची वेळ आली.

Video: ऋषभ पंतला Live सामन्यात मागावी लागली माफी, चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या नेमकं काय घडलं?
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 4:04 PM

भारत आणि बांग्लादेश कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर भारताची विजयी टक्केवारी आणि अव्वल स्थान टिकणार आहे. असं असताना पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या डावात भारताने 376 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला 227 धावांची मजबूत आघाडी मिळाली. असं बांगलादेशच्या डावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर माफी मागण्याची वेळ आली. मोहम्मद सिराजची माफी मागावी लागली. बांगलादेशच्या डावातील चौथ्या षटकात ऋषभ पंतकडून गडबड झाली. टीम इंडियाकडून चौथं षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डावखुऱ्या जाकिर हसनला पायचीत करण्यासाठी जोरदार अपली केली. यावेळी मोहम्मद सिराज आऊट असल्याबाबत निश्चिंत होता. पण पंचांनी नाबाद दिलं. त्यामुळे मोहम्मद सिराजसह इतर खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे टीम इंडियाकडे डीआरएस घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

निश्चित असलेल्या मोहम्मद सिराजने डीआरएससाठी कर्णधार रोहित शर्माकडे विनवणी केली. पण त्याने त्याचं म्हणणं न ऐकता विकेटकीपर ऋषभ पंतकडे मोर्चा वळवला. विकेटकीपर ऋषभ पंतने डीआरएस घेण्यास नकार दिला. त्याच्या म्हणण्यांनुसार चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. त्यामुळे त्याने सांगितलं की आऊट नाही आणि डीआरएस वाया जाईल. त्याचं एकूण रोहित शर्माने डीआरएस घेतला नाही. पण काही वेळानंतर स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर रिप्ले दाखवला गेला. यात चेंडू स्पष्टपणे लेग स्टंपला लागला होता. जर डीआरएस घेतला असता तर जाकीर बाद झाला असता.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, जशी ही चूक दृष्टीक्षेपात पडली तेव्हा सिराजने पंतला इशाऱ्यातून दाखवून दिलं. तेव्हा विकेटकीपिंग करणाऱ्या पंतला चूक लक्षात आली आणि त्यानेही माफी मागितली. दुसरीकडे, जाकीर हसन जास्त तग धरू शकला नाही. आकाश दीपने त्याला पुढच्या षटकात त्रिफळाचीत केलं. बांगलादेशचा संपूर्ण संघ फक्त 149 धावा करू शकला. त्यामुळे टीम इंडियाला 227 धावाची आघाडी मिळाली आहे. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्माची विकेट गमावली आहे. अवघ्या 5 धावांवर तस्किन अहमदने त्याला बाद केलं.

हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.