Marathi News Sports Cricket news India vs Bangladesh Test Series 2024 fast Bowler nahid rana gamechanger in india test series marathi news
IND vs BAN : पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या बॉलरचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला…
टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेमधील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला हरवून आल्यामुळे बांग्लादेश संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पाकिस्तानला बॅकफूटवर टाकणारा बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Follow us
पाकिस्तानविरूद्धची कसोटी मालिका बांगलादेशने 2-0 ने जिंकली. या विजयामध्ये 21 वर्षाच्या वेगवान गोलंदाजाने 150 किमी प्रतितास गोलंदाजी करत सर्वांनाच धक्का दिला
पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये 44 धावांत 4 विकेट त्याने घेतल्या. पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीमध्ये पराभव करण्यात युवा गोलंदाज नाहिद राणा याची महत्त्वाची भूमिका राहिली.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी चांगली तयारी केली आहे. आम्ही सराव सुरू केला आहे. भारतीय संघ खूप चांगला आहे, पण जो संघ चांगला खेळेल तोच जिंकेल, असं नाहिद राणा याने म्हटलं आहे.
मी कोणताही वेग निश्चित केलेला नाही. मी फक्त संघाची रणनीती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. मी कोणत्याही विशिष्ट गोलंदाजाला फॉलो करत नाही. मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकल्याचं राणा म्हणाला.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.