IND vs BAN : कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा? जाणून घ्या
India vs Bangladesh Test Cricket Series 2024 : टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्यात घरात कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलंय. त्यामुळे बांगलादेशचा विश्वास चांगलाच वाढलेला आहे. बांगलादेश आता पाकिस्ताननंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाही श्रीलंका दौऱ्यानंतर विश्रांतीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाही आता बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. क्रिकेट चाहते रोहितसेनेला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी उत्सूक आहेत. उभयसंघातील या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. अशात टीम इंडियाची कसोटी मालिकेसाठी घोषणा केव्हा होणार? असा प्रश्न भारतीय चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
स्पोर्ट्स तकनुसार, पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व असणार हे निश्चित आहे. तसेच टीममध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांचं कमबॅक निश्चित मानलं जात आहे. विराटने अखेरचा कसोटी सामना हा जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला होता. तर ऋषभ पंत 2022 मध्ये टेस्ट मॅच खेळला होता. अशात आता हे दोघेही बांगलादेश विरुद्ध कमबॅकसाठी उत्सुक आहेत. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आता मुंबईकर सरफराज खान आणि श्रेयस अय्यर या दोघांना संधी मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे.
आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तिघांना संधी मिळाल्यास, त्यांच्यावर बॅटिंग आणि बॉलिंग अशी दुहेरी जबाबदारी असेल. तर कुलदीप यादवला मुख्य स्पिनर म्हणून जागा मिळेल. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह या संधी मिळू शकते.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई.
दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर.
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संभावित संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप आणि अर्शदीप सिंह (दोघांपैकी एक) .