IND vs BAN : इंडिया-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs Bangladesh Test Series 2024 Schedule: टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आता कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने पराभूत करणाऱ्या बांगलादेशचं आव्हान असणार आहे.

IND vs BAN : इंडिया-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
bangladesh cricket team
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 1:24 AM

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेश क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश या दौऱ्यात कसोटीसह टी 20i मालिकाही खेळणार आहे. मात्र कसोटी मालिकेची सर्वाधिक चर्चा होत आहे, त्याचं कारणही तसंच आहे. विराट कोहली याचं जानेवारी 2024 नंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत याची 2 वर्षांनी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये विराट आणि पंतचा खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. आपण कसोटी मालिकेचं वेळापत्रक आणि सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील? हे जाणून घेऊयात.

उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पहिला सामना हा 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. तर त्यानंतर 4 दिवस सामन्याची सुरुवात 9 वाजून 30 मिनिटांनी होईल. त्यानंतर दुसरा आणि अंतिम सामना हा 28 सप्टेंबरपासून होणार आहे. हा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियम येथे होणार आहे.

रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्ड येत्या काही दिवसातच संघाची घोषणा करेल. बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. त्यामुळे बांगलादेशचा विश्वास वाढलेला आहे. अशात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.