IND vs ENG | अश्विन ना जयस्वाल ‘हा’ खेळाडू विजयाचा शिल्पकार, इंग्लंडसाठी पराभावाचा टर्निंग पॉईंट

ind vs eng 4th test matchwinner player : टीम इंडियाने इंग्लिश संघाचा धुरळा करत चौथा कसोटी सामनाही आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडने सगळ्या प्रश्नांची तयारी केली मात्र त्यांना अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आला अन् तिथेच त्यांचा घात झाला.

IND vs ENG | अश्विन ना जयस्वाल 'हा' खेळाडू विजयाचा शिल्पकार, इंग्लंडसाठी पराभावाचा टर्निंग पॉईंट
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 4:16 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने चौथ्याच दिवशी जिंकला. टीम इंडियाची पडझड झाली होती, मात्र शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी केलेल्या नाबाद भागीदारीने विजय साकारला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 3-1 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या पराभवासाठी टीम इंडियाचा एक खेळाडू कारणीभूत ठरलेला पाहायला मिळाला. अश्विन याने एका डावात घेतलेल्या पाच विकेट आणि जयस्वालच्या अर्धशतकामुळे विजयाचा पाया रचला. परतु दोन्ही डावात टीम इंडियाचा एक खेळाडू इंग्लंड संघावर वरचढ ठरला.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून  ध्रुव जुरेल आहे. टीम इंडियाकडून मधल्या फळीत खेळताना त्याने 90 आणि नाबाद 39 धावांची खेळी केली. पहिल्या डावातही टीम इंडियाचा डाव गडगडला होता. मात्र जुरेल हा फलंदाजीला उतरला आणि त्याने सामन्याचं चित्रच पालटवलं. जुरेल याने केलेल्या 90 धावांच्या खेळीचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला. कारण त्याने तळाच्या फलंदाजांना घेत भागीदारी करत इंग्लंडच्या लक्ष्याच्या जवळपास आणलं होतं.

जर जुरेल हा लवकर बाद झाला असता तर इंग्लंड संघाकडे मोठी आघाडी गेली असती. दुसऱ्या डावात इंग्लंड ऑल आऊट झाल्यावर टीम इंडियाला जेमतेम 192 धावा करायच्या होत्या. परंतु 112-5  विकेट अशी अवस्था झाली होती. त्यामुळे सर्वांच्या मनात धुसफूस सुरू झाली होती. कारण  बशीर आणि हार्टलीचे बॉल अप्रतिम स्पिन होत होते. मैदानावर शेवटची जोडी शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल यांची होती. मात्र दोन्ही युवा खेळाडूंनी संयमी खेळी केली.

दरम्यान, शुबमन गिल याने अर्धशतकाच्या जवळ आल्यावर दोन खणखणीत षटकार मारले. सामन्यात त्याने पहिली बाऊंड्री ही 120व्या चेंडूवर मारली. जुरेलचा हा दुसरा कसोटी सामना होता, मात्र एखाद्या परिपक्व खेळाडूसारखा तो मैदानावर आपला खेळ दाखवत होता. टीम इंडियाची भावी विकेटकीपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.