IND vs ENG 1st Test | पहिल्या कसोटीआधीच टीमला मोठा झटका, स्टार खेळाडू सरावादरम्यान जखमी, सगळेच घाबरले
IND vs ENG Test : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. सराव सत्रावेळी टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूच्या मनगटावरच बॉल बसलाय.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधी टीमला मोठा झटका बसला आहे. कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया मोठ्या संकटात सापडली. सराव सत्रावेळी एका खेळाडूच्या मनगटाला बॉल लागला आहे. बॉल इतका जोरात लागला की खेळाडूच्या हातातून बॅट खाली पडली. त्यानंतर तो थेट डग आऊटमध्ये जाऊन बसला. यावेळी वैद्यकीय टीमची मोठी धावपळ झाली. त्यासोबतच सगळे खेळाडूही त्याच्याजवळ जाऊन थांबलेले दिसले.
कोण आहे हे स्टार खेळाडू?
हा स्टार खेळाडू दुसरा तिसरास कोणी नसून श्रेयस अय्यर आहे. नेटमध्ये सराव करत असताना श्रेयस अय्यरच्या डाव्या मनगटावर चेंडू लागला. थ्रो डाऊनने फेकलेला चेंडू इतक्या जोरात त्याच्या हातावर बसला की त्याने हातातील बॅट सोडली. त्यानंतर त्याने एक बॉल खेळला पण जास्त वेदना होत असल्याने तो बाहेर बसला. त्यावेळी त्याचं मनगट बर्फाचा शेक देण्यात आला. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये अय्यर हा डगआऊटमध्ये बसलेला पाहायला मिळत आहे.
🚨Not so good news from Hyderabad, Shreyas Iyer got hit on the right forearm during the nets and walked off after trying to bat on.
It’s now reported that after getting ice pack treatment he started practicing again. pic.twitter.com/PfuaD3e4dB
— Knight Vibe (@KKRiderx) January 23, 2024
विराट कोहली खेळनार नाही
टीम इंडियाचा स्टार खेळाडू किंग विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. आधीच कोहली नसल्याने संघाची ताकद कमी झाली असताना अय्यरची दुखापत आता मोठी डोकेदुखी ठरणारी आहे. श्रेयस याने मधल्या फळीमध्ये फलंजदाजी करत अनेकवेळा संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. त्यामुळे आता अय्यर पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
पहिल्या दोन कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान