India vs England 1st Odi | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (india vs england 1st odi) सामन्यात पदार्पणवीर कृणाल पंड्या (krunal pandya) आणि प्रसिद्ध कृष्णाने (prasidha krishna) अफलातून कामगिरी केली.
पुणे : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात (india vs england 1st odi) 66 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव 251 धावांवर आटोपला. या सामन्यात टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी विजयी कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्या या दोघांनी अफलातून खेळी केली. या दोघांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. (india vs england 1st odi debutants Krunal Pandya and prasidha Krishna performed brilliantly)
Superb bowling display by #TeamIndia ?? after ??????? got off to a rollicking start ??
India win by 6️⃣6️⃣ runs and take a 1-0 lead in the 3-match ODI series #INDvENG @Paytm
Scorecard ? https://t.co/MiuL1livUt pic.twitter.com/0m58T6SdKq
— BCCI (@BCCI) March 23, 2021
कृणाल पंड्याची अष्टपैलू कामगिरी
कृणालने पदार्पणातील सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीस यांनी 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली. तसेच बोलिंग करताना कृणालने 1 विकेटही घेतली. कृणालने सॅम करनला आऊट केलं. कृणालची ही पहिली विकेट ठरली.
प्रसिद्ध कृष्णाची धमाकेदार कामगिरी
प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पदार्पणातील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रसिद्धने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना निर्णायक क्षणी आऊट केलं. प्रसिद्धने जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करनला आऊट केलं.
सलामी भागीदारी फोडली
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडची झोकात सुरुवात झाली होती. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने 135 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. टीम इंडिया बॅक फुटवर होती. भारताला विकेटची गरज होती. अशा निर्णायक क्षणी प्रसिद्धने आपल्या गोलंदाजीने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. यासह प्रसिद्धने पहिली विकेटही घेतली. तसेच ही जोडीही फोडली.
मालिकेत 1-0 ने आघाडी
दरम्यान या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना 26 मार्चला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला
Video | कृणाल पंड्याचा धमाका, पदार्पणात शानदार अर्धशतकी खेळीसह विश्व विक्रमाला गवसणी
(india vs england 1st odi debutants krunal pandya and prasidha krishna performed brilliantly)