Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला

कृणाल पंड्याने (Krunal Pandya) इंग्लंड विरुद्धच्या पदार्पणातील सामन्यात (india vs england 1st odi) वेगवान अर्धशतक लगावलं. त्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

Video | पदार्पणात अर्धशतकी खेळी, वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर, हार्दिकला मिठी मारत कृणाल रडला
कृणाल पंड्याने (Krunal Pandya) इंग्लंड विरुद्धच्या पदार्पणातील सामन्यात (india vs england 1st odi) वेगवान अर्धशतक लगावलं. त्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:54 PM

पुणे : कृणाल पंड्याने (Krunal Pandya) इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून स्वप्नवत पदार्पण केलं. कृणालने आपल्या पदार्पणात 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. यासह त्याने डेब्यू सामन्यात विश्व विक्रमाला गवसणी घातली. कृणालने या सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली. त्याने अर्धशतकी खेळी आपल्या वडीलांना (Himanshu Pandya) यांना समर्पित केली. टीम इंडियाच्या बॅटिंगनंतर कृणाल वडीलांच्या आठवणीत भावूक झालेला पाहायला मिळाला. कृणालने मैदानात आपल्या लहान भाऊ हार्दिकला (Hardik Pandya) मिठी मारत रडू लागला. याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. (india vs england 1st odi krunal pandya emotional after his 58 runs innings)

जानेवारी हिमांशू पंड्याचं निधन

कृणाल आणि हार्दिकचे वडील हिमांशू पंड्या यांचे 16 जानेवारीला निधन झाले होते. त्यावेळेस सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु होती. मात्र वडीलांच्या निधनामुळे कृणालला स्पर्धा सोडून माघारी जावे लागले होते. वडीलांच्या निधनामुळे पंड्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या मुलांनी क्रिकेटपटू व्हावं, असं त्यांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली होती. कृणाल आणि हार्दिकला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पुरवली. हार्दिक आणि कृणाल यशस्वी असण्यात हिमांशू यांचं मोठं योगदान आहे. मात्र आज जेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांची कारकिर्द ऐन जोमात असताना ते हयात नाहीत.

अर्धशतकी खेळी वडीलांना समर्पित

कृणालने इंग्लंड विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्याने ही इनिंग आपल्या वडीलांना समर्पित केली. पहिला डाव संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सने कृणालला संवाद साधण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र यावेळेसही कृणालचा कंठ दाटून आला होता. त्याला आपल्या वडीलांची उणीव भासत होती. कृणालला शब्द सुचत नव्हते. यामुळे कृणालने स्टार स्पोर्ट्सची माफीही मागितली.

हार्दिकच्या हस्ते टीम इंडियाची कॅप

सामन्याआधी हार्दिकने कृणालला टीम इंडियाची कॅप दिली. यावेळेसही कृणालने हार्दिकला मिठी मारली होती. तसेच आकाशाकडे पाहत वडीलांना अभिवादन केलं होतं. दरम्यान पंड्या बंधू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतात. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. या दोघांनी आतापर्यंत टीम इंडियाला तसेच मुंबई इंडियन्सला एकहाती सामना जिंकवून दिला आहे.

संबंधित बातम्या :

हार्दिक-कृणाल पांड्याच्या वडिलांचं निधन, सय्यद मुश्ताक स्पर्धा अर्ध्यावर सोडून माघारी

Video | कृणाल पंड्याचा धमाका, पदार्पणात शानदार अर्धशतकी खेळीसह विश्व विक्रमाला गवसणी

(india vs england 1st odi krunal pandya emotional after his 58 runs innings)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....