India vs England 2021, 1st odi | टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय

| Updated on: Apr 15, 2021 | 3:52 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना (India vs England 2021 1st odi LIVE Score)

India vs England 2021, 1st odi | टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय
India vs England 2021, 1st odi, LIVE Score: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड लाईव्ह अपडेट्स

पुणे : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या (india vs england 1st odi) एकदिवसीय सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तसेच भुवनेश्वर कुमारने 2 फलंदाजांना बाद केलं. तर कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (india vs england 1st odi live score updates in marathi maharashtra cricket association stadium pune ind vs eng 2021 odi cricket match news online) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

हेड टु हेड आकडेवारी

उभय संघात आतापर्यंत एकूण 100 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे. भारताने इंग्लंडचा 53 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 42 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

पुण्यातील कामगिरी

उभय संघात पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये 1 वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना 15 जानेवारी 2017 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला विजयासाठी 351 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र तरीही इंग्लंडला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. भारताने हा सामना 11 चेंडूआधी 7 विकेट्स गमावून जिंकला होता.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 23 Mar 2021 09:37 PM (IST)

    टीम इंडियाचा इंग्लंडवर 66 धावांनी विजय

    टीम इंडियाने इंग्लंडवर 66 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडचा भारतीय गोलंदाजांसमोर 251 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

  • 23 Mar 2021 09:14 PM (IST)

    इंग्लंडला आठवा धक्का

    कृणाल पंड्याने इंग्लंडला आठवा धक्का दिला आहे. कृणालने सॅम करनला शुबमन गिलच्या हाती 12 धावांवर आऊट केलं. सॅमनंतर आदिल रशीद मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 09:10 PM (IST)

    इंग्लंडला सातवा धक्का

    भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. भुवीने मोईन अलीला 30 धावांवर केएल राहुलच्या हाती कॅच आऊट केलं. मोईननंतर टॉम करन मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 09:04 PM (IST)

    इंग्लंडला सहावा धक्का, सॅम बिलिंग्स आऊट

    प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला सहावा धक्का दिला आहे. कृष्णाने सॅम बिलिंग्सला 18 धावावंर कर्णधार कोहलीच्या हाती कॅच आऊट केलं. बिलिग्सनंतर सॅम करन मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 08:17 PM (IST)

    शार्दुलचा इंग्लंडला दणका, एका ओव्हरमध्ये 2 झटके

    शार्दुल ठाकूरने इंग्लंडला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले आहेत. शार्दुलने आधी इयोन मॉर्गन आणि त्यानंतर जॉस बटलरला आऊट केलं. हे दोन्ही बाद झाल्यानंतर सॅम बिलिंग्स आणि मोईन अली ही नवी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 23 Mar 2021 08:03 PM (IST)

    वनप्लस 9 सीरीज स्मार्टफोन OnePlus 9, 9 Pro, 9R आणि स्मार्टवॉच्या लाँचिंगला सुरुवात, इथे पाहा Live

    मुंबई : वनप्लस 9 मालिकेचे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यास सुरवात झाली आहे. या मालिकेअंतर्गत कंपनी वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आर स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या व्यतिरिक्त, कंपनी या इव्हेंटमध्ये वनप्लस स्मार्टवॉच देखील लॉन्च करेल, आपण या स्मार्टफोनच्या लॉन्च इव्हेंटचा थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनल ‘वनप्लस इंडिया’ वर पाहू शकता. यूट्यूब वाहिनीवर देण्यात आलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि इंग्रजी अशा पाच भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.

  • 23 Mar 2021 08:00 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का, जॉनी बेयरस्टो आऊट

    शार्दुल ठाकूरने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. शार्दुलने जॉनी बेयरस्टोला 94 धावांवर कुलदीप यादवच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 23 Mar 2021 07:37 PM (IST)

    इंग्लंडला दुसरा धक्का

    प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. प्रसिद्धने आक्रमक बेन स्टोक्सला शुबमन गिलच्या हाती 1 धावेवर कॅच आऊट केलं आहे. स्टोक्स आऊट झाल्यानंतर इयॉन मॉर्गन मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 07:25 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का, जेसन रॉय आऊट

    प्रसिद्ध कृष्णाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेत इंग्लंडला पहिला दणका दिला आहे. प्रसिद्धने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं आहे. जेसनने 46 धावांची खेळी केली. 
     
     
  • 23 Mar 2021 07:11 PM (IST)

    जॉनी बेयरस्टोचे अर्धशतक

    जॉनी बेयरस्टोने  शानदार अर्धशतक झळकावलं आहे. तसेच बेयरस्टो आणि जेसन रॉयने सलामी शतकी भागीदारी केली आहे. हे दोघेही जोरदार फटकेबाजी करत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला विकेटची आवश्यकता आहे.

  • 23 Mar 2021 06:49 PM (IST)

    जेसन रॉय-जॉनी बेयरस्टोची सलामी अर्धशतकी भागीदारी

    इंग्लंडच्या जेसन रॉय-जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी इंग्लंडसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. जॉनी बेयरस्टो आक्रमकपणे फलंदाजी करत आहे.

  • 23 Mar 2021 06:14 PM (IST)

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.

  • 23 Mar 2021 05:51 PM (IST)

    इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे आव्हान

    टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 98 धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर कृणाल पंड्याने नाबाद 58 धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलनेही 62 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनेही 56 रन्स चोपल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

  • 23 Mar 2021 05:39 PM (IST)

    केएल राहुलचे अर्धशतक

    कृणाल पंड्यानंतर केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 23 Mar 2021 05:37 PM (IST)

    कृणाल पंड्याचे पदार्पणात शानदार अर्धशतक

    टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू  कृणाल पंड्याने पदार्पणात शानदार अर्धशतक झळकावलं आहे. अवघ्या 26 चेंडूत कृणालने अर्धशतक पूर्ण केलं. 

  • 23 Mar 2021 05:25 PM (IST)

    केएल–कृणालची अर्धशतकी भागीदारी

    शिखर धवन आणि हार्दिक पांड्या झटपट आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाचा डाव घसरला होता. मात्र त्यानंतर कृणाल पंड्या आणि केएल राहुलने टीम इंडियाचा डाव सावरत शानदार अर्धशतकी भागीदारी केली आहे. दरम्यान या दोघांना वैयक्तिक अर्धशतक लगावण्याची संधी आहे.

  • 23 Mar 2021 04:52 PM (IST)

    टीम इंडियाला पाचवा धक्का

    टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सने हार्दिक पांड्या आऊट केलं आहे. हार्दिकने 1 धाव केली. हार्दिकनंतर कृणाल पंड्या मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 04:45 PM (IST)

    शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार

    टीम इंडियाने शिखर धवनच्या रुपात चौथी विकेट गमावली आहे. शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. अवघ्या 2 धावांनी शिखरचं शतक हुकलं.

  • 23 Mar 2021 04:21 PM (IST)

    टीम इंडियाला तिसरा धक्का

    टीम इंडियाला तिसरी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. श्रेयस फटकेबाजी करण्याच्या नादात कॅच आऊट झाला. श्रेयसने 6 धावा केल्या. श्रेयसनंतर केएल राहुल मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 04:04 PM (IST)

    टीम इंडियाला दुसरा धक्का

    टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 56 धावांची शानदार खेळी केली. विराट आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

  • 23 Mar 2021 03:56 PM (IST)

    शिखर धवन-विराट कोहलीची दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. भारताला रोहित शर्माच्या रुपात 64 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर शिखर आणि विराटने दोघांनी डाव सावरला. या दरम्यान दोघांनी फटकेबाजी केली. यासह शतकी भागीदारी पूर्ण केली. दरम्यान दोघेही मैदानात सेट झाले आहेत. शिखरला शतक झळकावण्याची संधी आहे.

  • 23 Mar 2021 03:49 PM (IST)

    विराट कोहलीचे अर्धशतक

    कर्णधार विराट कोहलीने 50 चेंडूत 100 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे 61 वं अर्धशतक ठरलं.

  • 23 Mar 2021 03:42 PM (IST)

    शिखर धवनला मोईन अलीकडून जीवनदान

    मोईन अलीने शिखर धवनला जीवनदार दिले आहे. आदिल रशीद सामन्यातील 28 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर धवनने डीप मीड विकेटच्या दिशेने फटका मारला. तिथे मोईन अली होता. धवन आऊट झालाच होता. पण मोईन अलीने सोपा कॅच सोडला. त्यामुळे शिखरला 59 धावांवर जीवनदान मिळाले.

  • 23 Mar 2021 03:30 PM (IST)

    सिक्ससह गब्बर शिखरचे अर्धशतक

    शिखर धवनने सिक्स खेचत अर्धशतक पूर्ण केलं आहे.शिखरच्या कारकिर्दीतील हे 31 वं अर्धशतक ठरलं.  तसेच या सिक्ससह टीम इंडियाच्या  100 धावाही पूर्ण झाल्या आहेत.

  • 23 Mar 2021 02:53 PM (IST)

    टीम इंडियाला पहिला झटका

    टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. सलामवीर रोहित शर्मा आऊट झाला आहे. बेन स्टोक्सने रोहितला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 23 Mar 2021 02:40 PM (IST)

    रोहित शर्मा शिखर धवनची अर्धशतकी सलामी भागीदारी

    रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आहे. या दोघांनी टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली आहे.

  • 23 Mar 2021 02:26 PM (IST)

    टीम इंडियाची सावध सुरुवात

    टीम इंडियाने सावध सुरुवात केली आहे. पहिल्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाने बिनबाद 39 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 19 तर शिखर धवन 20 धावांवर खेळत आहेत.

  • 23 Mar 2021 02:07 PM (IST)

    शिखर धवनचे सलग 2 चौकार

    शिखर धवनने सामन्यातील 7 व्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले.

  • 23 Mar 2021 01:33 PM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्याील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 23 Mar 2021 01:11 PM (IST)

    इंग्लंडची टीम

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड

  • 23 Mar 2021 01:09 PM (IST)

    टीम इंडियाचे 11 शिलेदार

    विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिर पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा

  • 23 Mar 2021 01:06 PM (IST)

    इंग्लंडने टॉस जिंकला

    इंग्लंडने टॉस जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.

  • 23 Mar 2021 12:46 PM (IST)

    थोड्याच वेळात टॉस

    अवघ्या काही मिनिटांमध्ये टॉस उडवण्यात येणार आहे. त्यामुळे टॉस कोण जिंकणार,  याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

  • 23 Mar 2021 12:44 PM (IST)

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट आणि टी 20 नंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. हा पहिला एकदिवसीय सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Published On - Mar 23,2021 9:37 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.