India vs England 2021, 1st odi | गब्बरचं शतक हुकलं, शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (india vs england 1st odi) सामन्यात शिखर धवनचे (shikhar dhawan) अवघ्या 2 धावांनी शतक हुकले.

India vs England 2021, 1st odi | गब्बरचं शतक हुकलं, शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (india vs england 1st odi) सामन्यात शिखर धवनचे (shikhar dhawan) अवघ्या 2 धावांनी शतक हुकले.
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 5:18 PM

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात पहिला (India vs England 2021 1st odi) एकदिवसीय सामना खेळवण्यात येतोय. भारताचा सलामीवीर गब्बर शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला आहे. शिखर धवनचे अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे. धवन 98 धावांवर कॅच आऊट झाला. (india vs england 1st odi shikhar dhawan missed his hundred by 2 runs)

शिखरने 90 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर तो संथपणे खेळत होता. शिखर एक एक धाव काढत होता. त्याला धावांसाठी झगडावं लागत होतं. त्यामुळे शिखरवर दबाव निर्माण झाला होता.

बेन स्टोक्स सामन्यातील 39 वी ओव्हर टाकायला आला. शिखर 98 धावांवर खेळत होता. धवनला अवघ्या 2 धावांची गरज होती. लवकरात लवकर शतक लावायचं होतं. मात्र स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर शिखरने कर्णधार इयोन मॉर्गनच्या दिशेने फटका मारला. मॉर्गनने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. अशाप्रकारे धवन आऊट झाला. धवनने 106 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारासंह 98 धावांची खेळी केली.

59 धावांवर जीवनदान

शिखरला अर्धशतकानंतर 59 धावांवर खेळताना जीवनदान मिळालं. आदिल रशीद सामन्यातील 28 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर धवनने डीप मीड विकेटच्या दिशेने फटका मारला. तिथे मोईन अली होता. धवन आऊट झालाच होता. पण मोईन अलीने सोपा कॅच सोडला. अशाप्रकारे शिखरला जीवनदान मिळाले. या जीवनदानाचं शिखरने पुरेपुर फायदा घेतला. मात्र शतक झळकावण्यात अपयशी ठरला.

विराटसोबत शतकी भागीदारी

शिखरने कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं.

प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याचे पदार्पण

इंग्लंड विरुद्धच्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केलं आहे. कृणाल आणि प्रसिद्ध टीम इंडियाकडून एकदिवसीय पदार्पण करणारे 233 आणि 234 वे खेळाडू ठरले आहेत.

टीम इंडियाचे 11 शिलेदार

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिर पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

PHOTO | इंग्लंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टीम इंडियाचे टॉप 5 फलंदाज

Ind Vs Eng : पुण्यात पहिला एकदिवसीय सामना, हे 4 धुरंधर टीम इंडियाची बाजी पलटवू शकतात!

(india vs england 1st odi shikhar dhawan missed his hundred by 2 runs)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.