India vs England 2nd Test, 1st Day Highlights | रोहित-रहाणेची संयमी भागीदारी, पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 300 धावा

| Updated on: Feb 14, 2021 | 8:22 AM

या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

India vs England 2nd Test, 1st Day Highlights  | रोहित-रहाणेची संयमी भागीदारी, पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 300 धावा
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना (India vs England 2nd Test) खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 300 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 नाबाद धावांवर नाबाद होते. टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात एकूण 111 धावा केल्या. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 161 तर रहाणेने 67 धावा केल्या. (india vs england 2021 2nd test day 1 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

टीम इंडियाने सत्रनिहाय केलेल्या धावा

पहिलं सत्र – 106-3 (26 Overs)  (एकूण 106 धावा)

दुसरं सत्र – 189-3 (54 Overs) (83 धावा)

तिसरं सत्र – 300-6 (88 Overs) (111 धावा)

Key Events

हिटमॅनचे शतक

हिटमॅन रोहित शर्माने 130 चेंडूत झुंजार शतक पूर्ण केलं आहे. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी रोहितने अजिंक्य रहाणेच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यासह रोहितने शतकही लगावलं.

पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 300 धावा

टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 300 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 नाबाद धावांवर नाबाद होते. टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात एकूण 111 धावा केल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 13 Feb 2021 05:27 PM (IST)

    पहिल्या दिवसाचा खेळ संपला

    पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दिवसखेर 6 विकेट्स गमावून 300 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा रिषभ पंत आणि  अक्षर पटेल मैदानात नाबाद होते. पहिल्या दिवसात भारताकडून रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सर्वाधिक खेळी केली. रोहितने 161 तर रहाणेने 67 धावा केल्या.

  • 13 Feb 2021 05:05 PM (IST)

    टीम इंडियाला सहावा धक्का

    टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे.  अश्विन 13 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 13 Feb 2021 04:16 PM (IST)

    अजिंक्य रहाणे आऊट

    टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा केल्या.

  • 13 Feb 2021 04:08 PM (IST)

    ‘हिटमॅन’ रोहित आऊट, टीम इंडियाला चौथा धक्का

    टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. रोहित शर्मा 161 धावांवर आऊट झाला आहे. जॅक लीचने मोईन अलीच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने 231 चेंडूत 18 चौकार आणि 2 सिक्ससह 161 धावा केल्या.

  • 13 Feb 2021 04:03 PM (IST)

    रोहितचे दीडशतक पूर्ण

    रोहित शर्माने चेन्नईत खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 150 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने कसोटी कारकीर्दीत चौथ्यांदा दीडशे धावा केल्या आहेत. रोहितने 207 चेंडूत आपले 150 धावा पूर्ण केल्या.

    रोहितच्या दीडशे धावा पूर्ण

  • 13 Feb 2021 03:12 PM (IST)

    उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

    टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तिसऱ्या सत्रात  अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 13 Feb 2021 02:31 PM (IST)

    चहापानापर्यंत टीम इंडिया 3 बाद 189 धावा

    टीम इंडियाने चहापानापर्यंत 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने या दुसऱ्या सत्रात एकूण 83 धावा जोडल्या.

    टीम इंडियाचा स्कोअर 

    189-3 (54 Overs)

    रोहित शर्मा-  132* (178)

    अजिंक्य रहाणे – 80* (36)

  • 13 Feb 2021 02:20 PM (IST)

    चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    हिटमॅन रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीदरम्यान रोहितने झुंजार शतक पूर्ण केलं. कॅप्टन विराट कोहली शून्यावर बाद झाल्याने टीम इंडियाची 86-3 अशी स्थिती झाली होती. यानंतर या दोघांनी भारताचा डाव सावरत शानदार शतकी भागीदारी केली.

    रोहित-रहाणेची शतकी भागीदारी

  • 13 Feb 2021 01:24 PM (IST)

    ‘हिटमॅन’ रोहितचे झुंजार शतक

    हिटमॅन रोहित शर्माने 130 चेंडूत झुंजार शतक पूर्ण केलं आहे. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे  7 वं शतक ठरलं. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी रोहितने  अजिंक्य रहाणेच्या सोबतीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यासह रोहितने शतकही लगावलं.

  • 13 Feb 2021 01:10 PM (IST)

    चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

  • 13 Feb 2021 12:29 PM (IST)

    दुसऱ्या सत्राला सुरुवात

    दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे खेळत आहेत. रोहितची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शतकासाठी रोहितला अवघ्या काही धावांची आवश्यकता आहे.

  • 13 Feb 2021 11:47 AM (IST)

    लचंपर्यंत टीम इंडियाच्या 3 बाद 106 धावा

    टीम इंडियाने पहिल्या सत्रात लंचब्रेकपर्यंत 3 विकेट्स गमावून 106 धावा केल्या आहे. रोहित शर्मा 80 धावांवर नाबाद खेळत आहे. तर अजिंक्य रहाणे 5 रन्सवर नॉट आऊट आहे. भारताने 3 विकेट्स् स्वसतात गमावल्या. सलामीवीर शुबमन गिल आणि कॅप्टन विराट कोहली शून्यावर आऊट झाले. तर चेतेश्वर पुजारा 21 धावा करुन तंबूत परतला.

    पहिल्या सत्रापर्यंत टीम इंडियाचा स्कोअर

    106-3 (26 Overs)

    रोहित शर्मा – 80* (78) अजिंक्य रहाणे 5* (12)

  • 13 Feb 2021 11:31 AM (IST)

    भारताच्या 100 धावा पूर्ण

    टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ही सेट जोडी मैदानात खेळत आहे.

  • 13 Feb 2021 11:24 AM (IST)

    रोहित-रहाणे मुंबईकर जोडी मैदानात

    टीम इंडियाने 3 विकेट्स गमावल्याने आता रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ही मुंबईकर जोडी मैदानात खेळत आहे. या दोघांच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आहे.  या दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.

  • 13 Feb 2021 11:20 AM (IST)

    कॅप्टन कोहली शून्यावर आऊट

    टीम इंडियाला तिसरा झटका बसला आहे.  कॅप्टन विराट कोहली शून्यावर आऊट झाला. फिरकीपटू मोईन अलीने विराटला बोल्ड केलं. यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे.

  • 13 Feb 2021 11:17 AM (IST)

    चेतेश्वर पुजारा आऊट

    टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजारा  21 धावांवर आऊट झाला आहे. जॅक लीचने पुजाराला बेन स्टोक्सच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 13 Feb 2021 11:12 AM (IST)

    टीम इंडियाच्या 20 ओव्हरनंतर 84 धावा

    टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये  84 धावा केल्या आहेत. पहिली विकेट शून्यावर गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात नाबाद 84 धावांची भागीदारी झाली आहे. या दरम्यान हिटमॅन रोहित शर्माने शानदार अर्धशतक पूर्ण केलं.

  • 13 Feb 2021 10:50 AM (IST)

    हिटमॅनचे अर्धशतक

    रोहित शर्माने 46 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.  रोहितने चौकार लगावत अर्धशतक झळकावलं.

  • 13 Feb 2021 10:47 AM (IST)

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

    टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. सोबतच चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली आहे.

  • 13 Feb 2021 10:41 AM (IST)

    13 वी ओव्हर मेडन

    जॅक लीचने सामन्यातील 13 वी ओव्हर मेडन टाकली आहे. रोहित शर्माला लीचच्या गोलंदाजीवर एकही धाव घेता आली नाही.

  • 13 Feb 2021 10:29 AM (IST)

    10 ओव्हरनंतर टीम इंडियांच्या 1 बाद 36 धावा

    10 ओव्हरनंतर टीम इंडिया 1 विकेट गमावून 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत. भारताला पहिला झटका शून्यावर बसला. शुबमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित-पुजारा जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला.

  • 13 Feb 2021 09:42 AM (IST)

    शुबमन गिल शून्यावर आऊट

    टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारताने शून्यावर पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाला आहे. यामुळे भारताची 0-1 अशी स्थिती झाली आहे.

  • 13 Feb 2021 09:37 AM (IST)

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 13 Feb 2021 09:30 AM (IST)

    अशी आहे टीम इंडिया

    रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.

  • 13 Feb 2021 09:27 AM (IST)

    दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये 3 बदल

    इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहला विश्रांती देत त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. शहबाज नदीमच्या जागी अक्षर पटेलला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरऐवजी चायमनामॅन बोलर कुलदीप यादवला स्थान देण्यात आलं आहे.

  • 13 Feb 2021 09:23 AM (IST)

    अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण

    अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. कॅप्टन विराट कोहलीने कुलदीपला  टीम इंडियाची कॅप देत भारतीय संघात स्वागत केलं.

    अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण

  • 13 Feb 2021 09:04 AM (IST)

    भारताने टॉस जिंकला

    टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • 13 Feb 2021 08:56 AM (IST)

    टॉसचा किंग कोण?

    अवघ्या काही मिनिटांमध्ये टॉस केला जाणार आहे. टॉस फॅक्टर महत्वाचा असणार आहे. यामुळे टॉस कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Published On - Feb 13,2021 5:27 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.