India vs England 2nd Test, 3rd Day Highlights | भारताचा विजय दृष्टीक्षेपात, विजयासाठी 7 विकेट्सची आवश्यकता

| Updated on: Feb 15, 2021 | 5:27 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना (india vs england 2021 2nd test) खेळवण्यात येत आहे.

India vs England 2nd Test, 3rd Day Highlights | भारताचा विजय दृष्टीक्षेपात, विजयासाठी 7 विकेट्सची आवश्यकता
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथ्या कसोटीतील आजचा तिसरा दिवस आहे.

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यामधील (India vs England 2nd Test) आजचा (15 फेब्रुवारी) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारत दुसर्‍या कसोटीत जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला विजयासाठी आणखी 7 विकेट्सची आवश्यकता आहे. इंग्लंडसमोर भारताने 482 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने दुसर्‍या डावात 53 धावा देऊन 3 गडी गमावले आहेत. तिसर्‍या दिवशी अश्विनने इंग्लंडच्या दुसर्‍या डावात एक विकेट घेतला तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले. कर्णधार जो रूट आणि लॉरेन्स नाबाद असून चौथ्या दिवशी हे दोघेही आपल्या टीमसाठी झगडताना दिसतील. तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. अश्विनने भारताकडून शतक झळकावताना सर्वाधिक 106 धावा केल्या. (india vs england 2021 2nd test day 3 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

अश्विनचे शानदार शतक

अश्विनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना धमाकेदार शतक पूर्ण केलं. अश्विनने मोईन अलीच्या बोलिंगवर फोर ठोकत 134 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनच्या शतकी खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करता आल्या.

इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या. भारताकडे असलेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 15 Feb 2021 05:26 PM (IST)

    तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

    टीम इंडियाला विजयासाठी आणखी 7 विकेट्सची गरज आहे. भारताने इंग्लंडसमोर 482 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने दुसर्‍या डावात 53 धावा करुन 3 विकेट्स गमावल्या आहेत. तिसर्‍या दिवशी अश्विनने इंग्लंडच्या दुसर्‍या डावात एक विकेट घेतला तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले. कर्णधार जो रूट आणि लॉरेन्स नाबाद आहेत.

  • 15 Feb 2021 05:01 PM (IST)

    अक्षर पटेलची फिरकी, इंग्लंडला तिसरा झटका

    अक्षर पटेलने इंग्लंडला तिसरा दणका दिला आहे. अक्षरने जॅक लीचला शून्यावर आऊट केलं आहे. यामुळे इंग्लंडची 50-3 अशी स्थिती झाली आहे.

  • 15 Feb 2021 04:54 PM (IST)

    अश्विनचा दणका, इंग्लंडची दुसरी विकेट

    इंग्लंडने दुसरी विकेट गमावली आहे. अश्विनने रोरी बर्न्सला विराट कोहलीच्या हाती 25 धावांवर आऊट केलं.

  • 15 Feb 2021 04:26 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. अक्षर पटेलने  डोमिनिक सिबलेला एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 15 Feb 2021 03:54 PM (IST)

    इंग्लंडला बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 482 धावांचे आव्हान

    इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 15 Feb 2021 03:45 PM (IST)

    दहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी

    चेन्नई कसोटीत भारताच्या शेवटच्या क्रमांकावरील फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलंच जेरीस आणलं. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने शतक ठोकल्यानंतर अश्विन आणि मोहम्मद सिराज या जोडीने दहाव्या विकेटसाठी 49 भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात 286 धावा करत आल्या. भारताने आता इंग्लंडसमोर 482 धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.

  • 15 Feb 2021 03:43 PM (IST)

    अश्विनची शतकी खेळी, इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान

    शतक साजरं केल्यानंतर रवीचंद्रन अश्विन फार वेळ मैदानात टीकू शकला नाही. 106 धावांवर असताना ओली स्टोनच्या गोलंदाजीवर अश्विन त्रिफळाचित झाला. भारताने दुसऱ्या डावात 286 धावा करत इंग्लंडसमोर 481 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.

  • 15 Feb 2021 02:58 PM (IST)

    भारताला नववा झटका

    भारताने नववी विकेट गमावली आहे. इशांत शर्मा 7 धावांवर आऊट झाला आहे.

  • 15 Feb 2021 02:53 PM (IST)

    तिसऱ्या सत्राला सुरुवात

    तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राला सुरुवात झाली आहे. अश्विन आणि इशांत शर्मा मैदानात खेळत आहेत. अश्विनची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

  • 15 Feb 2021 02:21 PM (IST)

    टी ब्रेकपर्यंत टीम इंडियाकडे 416 धावांची मजबूत आघाडी

    टीम इंडियाने तिसऱ्या दिवसातील टी ब्रेकपर्यंत 73 ओव्हर्समध्ये  8 विकेट्स गमावून 221 धावा केल्या आहेत. यासह भारताने 416 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. अश्विन 68 तर इशांत शर्मा शून्यावर खेळत आहे.

  • 15 Feb 2021 01:55 PM (IST)

    भारताला आठवा धक्का

    टीम इंडियाला आठवा धक्का लागला आहे. कुलदीप यादव 3 धावांवर आऊट झाला आहे. दरम्यान टीम इंडियाकडे 405 धावांची आघाडी आहे.

  • 15 Feb 2021 01:52 PM (IST)

    भारताला सातवा झटका

    टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. विराट कोहली 62 धावांवर आऊट झाला. मोईन अलीने विराटला एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 15 Feb 2021 01:28 PM (IST)

    टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण

    टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. यासह भारताने दुसऱ्या डावात 395 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 15 Feb 2021 01:03 PM (IST)

    बोलिंगनंतर बॅटिंगने जलवा, अश्विनचे अर्धशतक

    अश्विनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट आणि अश्विन या दोघांनी सातव्या विकेटसाठी 80 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.

  • 15 Feb 2021 12:45 PM (IST)

    कॅप्टन कोहलीचे अर्धशतक

    कॅप्टन विराट कोहलीने झुंजार अर्धशतक लगावलं आहे. विराटच्या या अर्धशतकामुळे टीम इंडियाचा डाव सावरला आहे. दरम्यान अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत.

  • 15 Feb 2021 12:27 PM (IST)

    दुसऱ्या सत्राला सुरुवात

    दुसऱ्या सत्राताील खेळाला सुरुवात झाली आहे. अश्विन आणि विराट मैदानात खेळत आहेत. या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे. दोघांमध्ये  60 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. तसेच टीम इंडियाकडे 350 पेक्षाही अधिक रन्सची आघाडी आहे.

  • 15 Feb 2021 11:45 AM (IST)

    लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाची 6 बाद 156 धावांपर्यंत मजल

    दुसऱ्या डावात टीम इंडियाची बिकट अवस्था झाली आहे. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावले असून, 156 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली 38 तर रवीचंद्रन अश्विन 34 धावांवर खेळत आहेत.

  • 15 Feb 2021 10:53 AM (IST)

    टीम इंडियाकडे 300 धावांची आघाडी

    टीम इंडियाने 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. कॅप्टन कोहलीने चौकार खेचत 300 धावांचा टप्पा पूर्ण केला.

  • 15 Feb 2021 10:49 AM (IST)

    अक्षर पटेल आऊट

    भारताने दुसऱ्या डावात एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या आहेत. अक्षर पटेल आऊट झाला आहे. यामुळे भारताची 106-6 अशी स्थिती झाली आहे.

  • 15 Feb 2021 10:37 AM (IST)

    भारताचा अर्धा संघ तंबूत

    टीम इंडियाने पाचवी विकेट्स गमावली आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आऊट झाला आहे. रहाणे 10 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 15 Feb 2021 10:11 AM (IST)

    रिषभ पंत आऊट

    टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. पुजारा, रोहितनंतर रिषभ पंत आऊट झाला आहे. यामुळे भारताची 65-4  अशी स्थिती झाली आहे.

  • 15 Feb 2021 09:50 AM (IST)

    ‘हिटमॅन’ रोहित आऊट

    हिटमॅन रोहित शर्मा 26 धावांवर स्टंपिग आऊट झाला.  विकेटकीपर बेन फोक्सने जॅक लीचच्या बोलिंगवर स्टंपिंग आऊट केलं.

  • 15 Feb 2021 09:41 AM (IST)

    पुजारा रनआऊट

    टीम इंडियाची तिसऱ्या दिवसाची वाईट सुरुवात झाली आहे. चेतेश्वर पुजारा 7 धावांवर रनआऊट झाला आहे. यामुळे भारताचा 2 बाद 55 अशी स्थिती झाली आहे. पुजारा बाद झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली मैदानात आला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

  • 15 Feb 2021 09:36 AM (IST)

    तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 54-1 या धावसंख्येपासून बॅटिंगला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.

  • 15 Feb 2021 08:47 AM (IST)

    सामन्याचा तिसरा दिवस

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस आहे. भारताने दुसऱ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या. भारताने यासह 249 धावांची आघाडी घेतली आहे.

Published On - Feb 15,2021 5:26 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.