India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी

टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात (India vs England 2021 4th T20) 8 धावांनी विजय मिळवला. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.

India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी
टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्या टी 20 सामन्यात (India vs England 2021 4th T20) 8 धावांनी विजय मिळवला. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 12:08 AM

अहमदाबाद : टीम इंडियाने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या चौथ्या टी 20 सामन्यात (India vs England 2021 4th T20) इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर जेसन रॉयने 40 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकरूने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. (India vs England 2021 4th T20 suryakumar yadav scored 57 runs and shardul thakur gets 3 wickets)

शार्दुलच्या निर्णायक 3 विकेट्स

शार्दुलने या सामन्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने 4 ओव्हरमध्ये एकूण 42 धावा दिल्या. यामध्ये त्याने बेन स्टोक्स, इयोन मॉर्गन आणि ख्रिस जॉर्डन या तिघांना बाद केलं. विशेष म्हणजे शार्दुलने निर्णायक वेळी स्टोक्स आणि मॉर्गनला सलग बाद केलं. शार्दुलच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केलं. तसेच शार्दुलने बॅटिंग करताना 4 चेंडूत 2 चौकारांसह महत्वपूर्ण 10 धावा केल्या.

सूर्यकुमारचे अफलातून अर्धशतक

सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. सुर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली.

मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2021, 4th T20 | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर 8 धावांनी मात, मालिकेत 2-2 ने बरोबरी

सूर्य तळपला ! इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक

(India vs England 2021 4th T20 suryakumar yadav scored 57 runs and shardul thakur gets 3 wickets)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.