India vs England 2021 | विराटने क्रिकेट सुरु ही केलं नव्हतं तेव्हापासून करतोय बोलिंग, जेम्स अँडरसन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार?

जेम्स अँडरसनचा हा 5 वा भारत (India vs England) दौरा आहे.

India vs England 2021 | विराटने क्रिकेट सुरु ही केलं नव्हतं तेव्हापासून करतोय बोलिंग, जेम्स अँडरसन टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार?
जेम्स अँडरसन
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 2:51 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात उद्यापासून (5 फेब्रुवारी) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी गत कसोटी मालिकेत यजमान संघाला पराभूत केलं आहे. यामुळे दोन्ही संघ आमनेसामने भिडण्यास उत्सुक आहेत. इंग्लंडच्या ताफ्यात असा एक खेळाडू आहे जो 18 वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli) जेव्हा फर्स्ट क्लास डेब्युही झालं नव्हतं तेव्हापासून हा खेळाडू आपल्या गोलंदाजीवर विरोधी संघाला नाचवतोय. या गोलंदाजाचं नाव आहे जेम्स अँडरसन (James Anderson). अँडरसन हा क्रिकेट खेळणाऱ्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. अँडरसन क्रिकेट विश्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी तो एक आहे. (India vs England 2021 James Anderson has been playing Test cricket for the last 19 years)

अँडरसनला या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आलं आहे. अँडरसन इंग्लंडचं प्रमुख अस्त्र आहे. त्याने आतापर्यंत 157 कसोटींमध्ये एकूण 606 विकेट्स घेतल्या आहेत. या आकड्यावरुनच तो किती अनुभवी आहे, याचा अंदाज येतो. टीम इंडिया जरी भारतात खेळत असली तरी अँडरसनपासून सावध रहावं लागणार आहे. भारतीय फलंदाजांसमोर अँडरसनचं तगडं आव्हान असणार आहे.

अँडरसनचा 5 वा भारत दौरा

अँडरसनचा हा पाचवा भारत दौरा आहे. तो याआधी 2006, 2008, 2012 आणि 2016 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्याने या सर्व दौऱ्यात  एकूण 10 सामन्यात  26 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला भारतीय खेळपट्ट्यांवर कशी गोलंदाजी करायची याबाबत माहिती आहे. यामुळे फलंदाजांना अंडरसनपासून जरा जपूणच रहावं लागणार आहे.

चेन्नईची खेळपट्टी कोणासाठी अनुकूल?

कोरोना संसर्गानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नई तर उर्वरित सामने हे अहमदाबाज येथे खेळण्यात येणार आहेत. चेन्नईची खेळपट्टी ही स्पीनर्ससाठी पोषक आहे. त्यामुळे अँडरसनला चेन्नईमध्ये विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

अँडरसन आणि ब्रॉड हिट जोडी

अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉर्ड हे इंग्लंडचे प्रमुख गोलंदाज आहेत. या दौऱ्यात त्यांच्या खांद्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे. या दोघांनी आतापर्यंत कसोटीमध्ये 1100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉडने 144 टेस्टमध्ये 517 विकेट्स घेतल्या आहेत. तर अँडरसनच्या नावे 600 पेक्षा अधिक विकेट्स आहेत. यामुळे दोघांच्या मिळून 1100 विकेट्स आहेत. असं असलं तरी या दोघांना चेन्नईमध्ये गोलंदाजीदरम्यान विकेट्ससाठी संघर्ष करावा लागू शकतो. यामुळे या जोडीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

संबंधित बातम्या :

England Tour India | टीम इंडिया जेम्स अँडरसनला कुंबळेचा रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून रोखणार ?

England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

(India vs England 2021 James Anderson has been playing Test cricket for the last 19 years)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.