India vs England 2nd T 20I | विराट फॉर्ममध्ये परतला, पण त्यासाठी कुणाचा कानमंत्र कामी आला? ऐका खुद्द चॅम्पियन काय म्हणतोय?

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याने या खेळीचं श्रेय एबी डी व्हीलियर्सला (ab de villiers) दिलं आहे.

India vs England 2nd T 20I | विराट फॉर्ममध्ये परतला, पण त्यासाठी कुणाचा कानमंत्र कामी आला? ऐका खुद्द चॅम्पियन काय म्हणतोय?
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याने या खेळीचं श्रेय एबी डी व्हीलियर्सला (ab de villiers) दिलं आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 12:27 AM

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये (India vs England 2nd T 20I) 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. इंग्लंडने विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विराटसेनेने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक नाबाद 73 धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर इशान किशनने 56 धावांची खेळी केली. विराट या नाबाद खेळीसह फॉर्ममध्ये परतला. त्याने या खेळीचं श्रेय आफ्रिकेचा मिस्टर 360 असलेला फलंदाज एबी डी व्हीलियर्सला (ab de villiers) दिलं. गेल्या काही सामन्यांपासून विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. तो सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला होता. (india vs england 2nd t 20i virat kohli gives his 73 scored credit to ab de villiers)

विराट काय म्हणाला ?

“मी बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं. संघाच्या विजयात मी योगदान दिलं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे मी 70 धावांच्या खेळीपेक्षा संघाचा विजय झाला यासाठी आनंदी आहे. मी प्रत्येक चेंडूवर लक्षं ठेवलं. अनुष्का माझ्यासोबत इथे आहे. ती माझ्या पाठीशी आहे. मी या सामन्याआधी एबीसोबत चर्चा केली. त्यावर मला एबीने फक्त चेंडूवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. मी त्याचा सल्ला मानला. त्याने सांगितलं तसं केलं”, असं म्हणतं विराटने आपल्या खेळीचं श्रेय एबीला दिलं.

वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक

आमच्यासाठी हा चांगला सामना राहिला. आम्ही अपेक्षित त्या सर्व बाबतीत चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी सामन्यातील अखेरच्या 5 ओव्हरमध्ये फक्त 34 धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडला 170 च्या आत रोखण्यात यश आले. विशेष करुन वॉशिंग्टनने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने बांधून ठेवलं, असं म्हणत विराटने सुंदरचं कौतुक केलं. सुंदरने या सामन्यातील 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

पदार्पणवीर इशान किशनचं कौतुक

“सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं होतं. चेंडू कमी उसळत होता. इशानने अफलातून फलंदाजी केली. मी चांगली कामगिरी करण्याचे शंभर टक्के प्रयत्न केले. पण इशानने इंग्लंडला विजयापासून दूर ठेवलं. इशानने पदार्पणात शानदार खेळला. आम्ही इशानला आंतरराष्ट्रीय गोलंदाजां विरुद्ध फटकेबाजी करताना पाहिलं आहे. इशान फटकेबाजी करत होता. पण तो जबाबदारीने खेळत होता”, असं म्हणत विराटने इशानचं कौतुक केलं.

मालिकेत बरोबरी

या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी 15 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Ishan Kishan | किशनच्या खेळीने ‘गब्बरचं’ टेन्शन वाढलं, संघातील स्थान कायम राखण्यासाठी शिखरसमोर इशानचं आव्हान

(india vs england 2nd t 20i virat kohli gives his 73 scored credit to ab de villiers)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.