India vs England 2nd Test | अश्विनची फिरकी इंग्लंडला गिरकी, ठरला पहिलाच गोलंदाज

अश्विनने (r ashwin) पहिल्या डावात गोलंदाजी करताना एकूण 5 फलंदाजांना आऊट केलं.

India vs England 2nd Test | अश्विनची फिरकी इंग्लंडला गिरकी, ठरला पहिलाच गोलंदाज
टीम इंडिया
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 6:01 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमलवर दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळण्यात येत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर ऑल आऊट केलं. त्यामुळे दुसऱ्या डावात 195 धावांच्या आघाडीसह 54 धावा केल्या. यामुळे भारताने दुसऱ्या दिवसखेर 249 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात लोकल बॉय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. (India vs England 2nd Test 2nd day r ashwin is the first bowler to take 200 Test wickets of left handed batsman)

काय आहे पराक्रम?

यासह इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर गुंडाळण्यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉर्डला आऊट करत अश्विनने 5 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विन कसोटीमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना 200 वेळा बाद करणारा पहिला फलंदाज ठरला.

अँडरसनला पछाडलं

अश्विनने मायदेशातील कसोटींमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले. अँडरसनने 89 कसोटीत 22 वेळा इंग्लंडच्या भूमीवर पाच विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत अश्विनच्या पुढे फक्त तीन गोलंदाज आहेत. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरनने तब्बल 45 वेळा ही कामगिरी केली आहे. तर रंगाना हेराथ 26 आणि भारताच्या अनिल कुंबळेने 25 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतात  23 वेळा 5 विकेट्स

अश्विनने इंग्लंडचा डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, ऑली स्टोन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बाद केलं. यासह अश्विनने कसोटीमध्ये 29 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनने एकूण 23 वेळा भारतात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 6 वेळा भारताबाहेर ही कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या :

Ravichandran Ashwin | अश्विनच्या फिरकीवर भल्याभल्यांची गिरकी, मुरलीधरनचा विक्रम मोडला

India vs England 2nd Test, 2nd Day Highlights | दुसऱ्या दिवसखेर रोहित-पुजारा नाबाद, टीम इंडियाकडे 249 धावांची भक्कम आघाडी

India vs England 2nd Test | Video | ‘उडता’ रिषभ, विकेटकीपर पंतचा एकहाती भन्नाट कॅच

(India vs England 2nd Test 2nd day r ashwin is the first bowler to take 200 Test wickets of left handed batsman)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.