India vs England 3rd T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20 सामना 16 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

India vs England 3rd T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t20i 2021) सामना खेळवण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:00 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (16 मार्च) तिसरा टी 20 सामना (India vs England 3rd T20I) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium Ahmedabad) करण्यात आले आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान ही 5 सामन्याची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केलं. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. (india vs england 3rd t20 match preview)

दोन्ही संघ तुल्यबळ

आतापर्यंत उभय संघात एकूण 16 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे.

कोणाला संधी कोणाला डच्चू?

पदार्पणातील सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 56 धावा ठोकल्या. तर दुसऱ्या बाजूला केएल राहुल अपयशी ठरला. तर पहिल्या सामन्यात शिखर धवनही अपयशी ठरला होता. इशानने पदार्पणातील सामन्यात संधी सोनं केलं. त्यामुळे आता शिखर धवन आणि केएल राहुलसमोर इशानने आव्हान उभं केलं आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यातही शिखर धवनला बाहेर बसावे लागू शकते. तर केएलसमोर चांगली खेळी करण्याचे आव्हान असेल.

रोहितला संधी मिळणार?

मुंबईकर रोहित शर्माला पहिल्या 2 सामन्यात संधी मिळाली नाही. रोहित गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे रोहितला तिसऱ्या सामन्यात संधी मिळणार की नाही, याकडे सर्व रोहित चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे.

इशान, पंत आणि विराटला रोखण्याचे आव्हान

इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या इशान किशन, विराट कोहली आणि रिषभ पंत या तिकडीला रोखण्याचे आव्हान असणार आहे. या तिघांनी दुसऱ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळे या तिघांनी रोखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर असेल.

नंबर 1 होण्यासाठी सर्व सामने जिंकणं आवश्यक

भारताला टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी उर्वरित सामने जिंकणं बंधनकारक असणार आहे. भारताला अव्वल क्रमांकासाठी ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. यासाठी टीम इंडियाचा हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. तसेच अव्वल होण्याच्या दिशेने वाटचाल कायम ठेवण्याचा मानस असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vd England 2nd T2OI | शानदार विजयानंतरही टीम इंडियाला मोठा धक्का

Suryakumar Yadav | टी 20 डेब्यूनंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….

(india vs england 3rd t20 match preview)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.