India vs England 3rd Test | घरच्या मैदानात लोकल बॉय अक्षर पटेलचा इंग्लंडला दणका, घेतल्या सहा विकेट्स
अक्षर पटेलने (Axar Patel) इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या.
अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) तिसरा कसोटी सामना (India vs England 2021 3rd Test) खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा पहिला डाव टीम इंडियाच्या फिरकी जोडीने अवघ्या 112 धावांवर गुंडाळला. यामध्ये भारताच्या फिरकी जोडीने महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारताकडून लोकल बॉय अक्षर पटेलने (Axar Patel) सर्वाधिक 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अक्षरने सलग 2 डावांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. (india vs england 3rd test 1st day local boy axar patel take 6 wickets against england)
.@akshar2026 is the ? with the ball ????
6️⃣ wickets in front of his home crowd ?️@Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/PzJ2eY8jSV
— BCCI (@BCCI) February 24, 2021
अक्षरने इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानात टिकून दिले नाही. अक्षरने झॅक क्रॉली, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट बोर्ड या महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं. अक्षरने एकूण 21.4 ओव्हरमध्ये 38 धावा देत या 6 विकेट्स पटकावल्या. तर 21. 4 षटकांमधून 6 मेडन ओव्हर्स फेकल्या. दरम्यान अक्षरने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यासह अक्षर पटेल पदार्पणातील सामन्यात 9 विकेट्स घेणारा नववा गोलंदाज ठरला होता.
2⃣ Tests2⃣ five-wicket hauls, so far@akshar2026 – the local boy – continues to make merry as he scalps his fifth wicket. ??
England nine down! @Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/DJuhncFPd0
— BCCI (@BCCI) February 24, 2021
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात
टीम इंडियाच्या पहिल्या डावात डीनर ब्रेक पर्यंत बिनबाद 5 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात नाबाद खेळत आहेत. या सलामी जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.
That's Dinner on Day 1 of the third @Paytm #INDvENG #PinkBallTest!#TeamIndia 5/0 in 5 overs after bowling out England for 112.
Scorecard ? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/OFAG8Ew0eF
— BCCI (@BCCI) February 24, 2021
इशांत शर्माचा 100 वा सामना
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना आहे. इशांत टीम इंडियाकडून 100 टेस्ट मॅच खेळणारा एकूण 11 वा तर कपिल देव यांच्यानंतर दुसराच वेगवान गोलंदाज ठरला आहे. इशांतने पहिल्या डावात 1 विकेट घेतली.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.
इंग्लंड प्लेइंग इलेवन
जो रूट (कर्णधार), डॉम सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
संबंधित बातम्या :
Axar Patel | पदार्पणात अक्षर पटेलचा इंग्लंडला जोरदार ‘पंच’; ‘ही’ कामगिरी करणारा नववा भारतीय
(india vs england 3rd test 1st day local boy axar patel take 6 wickets against england)