India vs England 3 rd Test | कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 22 सामने दुसऱ्याच दिवशी निकाली, टीम इंडियाने किती सामने जिंकले?
टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील (india vs england 3rd test) अवघ्या दुसऱ्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात (India vs England 3rd Tets) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीमच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 2 दिवसांमधील 3 सत्रांमध्ये 2 वेळा ऑल आऊट केलं. तर जो रुटच्या (Joe Root) कॅप्टन्सीमध्ये इंग्लंडनेही भारताचा 1 डाव गुंडाळला. दरम्यान हा सामना अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातच निकाली निघाला. पण कसोटी सामना हा दुसऱ्या दिवशी निकाली निघण्याची ही काही पहिली वेळ नाही. (india vs england 3rd test in test cricket history 22 Test matches have ended on the second day)
आतापर्यंत 22 कसोटी सामने दुसऱ्या दिवशी निकाली
आतापर्यंत 22 टेस्ट सामने दुसऱ्या दिवशीच निकाली निघाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात 28 ऑगस्ट 1882 रोजी खेळवण्यात आला होता. हा सामना 2 दिवसात निकाली निघाला होता. त्यानंतर 1950 पर्यंत एकूण 15 टेस्ट मॅचेस या दुसऱ्याच दिवशी संपल्या. तर 2000 पासून ते आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने हे दुसऱ्याच दिवशी आटोपले आहेत.
टीम इंडियाची अफगाणिस्तानवर मात
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या दिवशीच विजय मिळवला. भारताने या पूर्वी अशीच कामगिरी 3 वर्षांपूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध केली होती. 14 जून 2018 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अवघ्या 2 दिवसात निकालात निघाला होता. भारताने या सामन्यात एका डावाने विजय मिळवला होता.
चौथी कसोटीही अहमदाबादमध्येच
दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून भारताचा इंग्लंडवर एकतर्फी मालिका विजय मिळवण्याचा मानस असेल.
संबंधित बातम्या :
India vs England 3rd Test | अहमबदाबादमध्ये टीम इंडियाकडून इंग्लंडला पराभवासह दुहेरी धक्का, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात
Virat Kohli | शानदार विजयासह कर्णधार कोहलीचा ‘विराट’ विक्रम, ‘कॅप्टन कुल’ धोनीचा रेकॉर्ड ब्रेक
(india vs england 3rd test in test cricket history 22 Test matches have ended on the second day)