IND vs ENG 3rd Test Live Streaming | टीम इंडिया-इंग्लंड तिसरा सामना कधी आणि कुठे?
India vs England 3rd Test Live Streaming | बेन स्टोक्सच्या इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. इंग्लंडने 24 तासांआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
मुंबई | इंग्लंड क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली आहे. या मालिकेतील 2 सामने यशस्वीपणे पार पडले आहेत. हैदराबादमध्ये झालेला सलामीचा सामना हा इंग्लंडने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. तर त्यानंतर विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना तिसऱ्या सामन्याचे वेध लागले आहे. हा तिसरा सामना कधी, कुठे आणि केव्हा होणार? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना हा गुरुवारी 15 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना हा राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).