India vs England 4th T20I | टीम इंडियासाठी ‘करो या मरो’, मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील चौथा (india vs england 4th t20) सामना आज (18 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे.
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (18 मार्च) टी 20 मालिकेतील (India vs England 4th T20I) चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium Ahmedabad ) करण्यात आले आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना निर्णायक आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी ही मॅच ‘करो या मरो’ची असणार आहे. (india vs england 4th t20 victory is important for Team India to maintain the challenge in the series)
It's Match Day!#TeamIndia will look to bounce back and level the series as they take on England in the 4th T20I.@Paytm #INDvENG pic.twitter.com/IwfsoPLHyh
— BCCI (@BCCI) March 18, 2021
टीम इंडियासमोरचे आव्हान
टीम इंडियासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे सलामी जोडी. भारताने तिन्ही सामन्यात वेगवेगळ्या सलामी जोडया खेळवल्या आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि शिखर धवन ही सलामी जोडी होती. दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि इशान किशनने भारतीय फलंदाजीची सुरुवात केली होती. तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने सुरुवात केली होती. मात्र या तिन्ही जोड्या भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यास अपयशी ठरल्या. चांगली सुरुवात न मिळाल्याने सर्व दबाव मधल्या फळीतील फलंदाजांवर येत आहे. यामुळे या चौथ्या सामन्यात सलामी जोडीकडून मोठ्या आणि आश्वासक सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.
केएल राहुल यशस्वी
केएलने पहिल्या 2 सामन्यात सातत्याने निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतरही केएलवर टीम मॅनेजमेंटने तिन्ही सामन्यात विश्वास दाखवला. केएलने पहिल्या 3 सामन्यात अनुक्रमे 1,0,O अशी खेळी केली. त्यामुळे केएलला चौथ्या सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Another failure for KL Rahul.
1st T20I — 1(4)2nd T20I — 0(6)3rd T20I — 0(4)
Mark Wood draws first blood.
India – 7/1 (2.3 overs) #INDvENG https://t.co/Yu8XhtOjd8
— Cricbuzz (@cricbuzz) March 16, 2021
मार्क वुडचं आव्हान
भारतीय फलंदाजांसमोर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडचे आव्हान असणार आहे. वुड टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय. वुडने आतापर्यंत या मालिकेतील 2 सामने खेळला. त्यापैकी 2 सामने इंग्लंडने जिंकले. वुडने पहिल्या सामन्यात 1 तर तिसऱ्या सामन्यात 3 विकेट घेतल्या. यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यामुळे वुड विरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडियाला रणनिती आखावी लागणार आहे.
टॉस फॅक्टर म्हत्वाचा
या मालिकेत टॉस महत्वाचा ठरला आहे. जो संघ टॉस जिंकला तो मॅच जिंकला, असं समीकरण या मालिकेत लागू झालंय. इंग्लंडने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि मॅचही जिंकली. तेच भारताबाबत झालं. टीम इंडियाने टॉस जिंकला आणि सामना जिंकला. त्यामुळे टॉस हा महत्वाची भूमिका बजावतोय. यामुळे या सामन्यात टॉसचा किंग कोण ठरणार यावरच या मालिकेच्या निर्णयाचं भवितव्य ठरणार आहे.
फिरकी गोलंदाजीची डोकेदुखी
टीम इंडियाची फिरकी गोलंदाज यांना उल्लेखनीय कामगिरी करता येत नाहीये. त्यामुळे भारतासमोर हा चिंतेचा विष आहे. युजवेंद्र चहल टीम इंडियाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. मात्र चहलने तिसऱ्या सामन्यात अनेक धावा लुटल्या होत्या. यामुळे चहलला या सामन्यात आक्रमक गोलंदाजी करावी लागणार आहे.
सामना गमावल्यास मालिकेस मुकणार
टीम इंडियासाठी हा चौथा टी 20 सामना प्रतिष्ठेचा असणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेतील आव्हान कायम राखता येणार आहे. तसेच पराभूत झाल्यास मालिकाही गमावावी लागेल. यामुळे या सामन्यात विराटसेना कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.
संबंधित बातम्या :
Ind Vs Eng : चौथ्या टी ट्वेन्टीत विराटची प्लेइंग 11 कोणती? केएल राहुलचं काय होणार? चाहरला संधी मिळणार?
VIDEO : भर मैदानात विराट कोहली भडकला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला
(india vs england 4th t20 victory is important for Team India to maintain the challenge in the series)