पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारण्याची हिंमत कुठून आली, शार्दुलच्या प्रश्नावर सूर्यकुमार काय म्हणाला?
टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20i) इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) पहिल्याच चेंडूवर अफलातून षटकार खेचला.
अहमदाबाद : “मी जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल (IPL) क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलं आहे. तो नवख्या फलंदाजांना बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी आयपीएलमध्ये त्याच्या विरोधात गेल्या 3 वर्षांपासून खेळतोय. त्यामुळे मला कल्पना आली आहे. मी हा फटका माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून खेळत आलो आहे. लोकल, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मी असे फटके मारले आहेत. आम्ही सुरुवातीला रबर आणि टेनिस बोलने सिमेंटच्या पीचवर क्रिकेट खेळायचो. तेव्हापासून मी हा शॉट अवगत केला आहे”, असं उत्तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिलं. पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरसारख्या गोलंदाजाला सिक्स मारण्याची हिमंत कुठून आली, असा प्रश्न शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) सूर्याला विचारला. यावर सूर्याने वरील उत्तर दिलं. सामन्यानंतर शार्दुल ठाकूरने सूर्यकुमारची मुलाखत घेतली. बीसीसीआयने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. (india vs england 4th t20i suryakumar yadav revils secret about first international ball on six)
An audacious first-ball six ?A thrilling final over ?A series-levelling win ?@surya_14kumar & @imShard – two stars of #TeamIndia's win in the 4th @Paytm #INDvENG T20I – chat up. ?? – By @RajalArora
Watch the full interview ? ?https://t.co/sUnrwPsHVi pic.twitter.com/YV8Oc1T7m1
— BCCI (@BCCI) March 19, 2021
भारताने इंग्लंडचा चौथ्या टी 20 सामन्यात 8 धावांनी शानदार विजय मिळवला. इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 177 धावांवर रोखले. अशाप्रकारे भारताने हा सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली. मुंबईकर सूर्यकुमार हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच फलंदाजी करताना अफलातून 57 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे त्याने आपल्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सूर्याने सिक्स फटकावला.
Was this the best-ever first international ball played of all time?#INDvENG #SuryakumarYadav #IndiaTaiyarHai #TeamIndia pic.twitter.com/IekaNPpCXR
— Star Sports (@StarSportsIndia) March 19, 2021
पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी
सूर्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र त्याला त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र सूर्याने चौथ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. सूर्याला सामन्यात इशान किशनच्या जागी संधी देण्यात आली. सूर्याने मैदानात येताच पहिल्याच चेंडूवर अफलातून सिक्स खेचला. त्यानंतर सूर्याने अवघ्या 28 चेंडूत पहिलंवहिलं अर्धशतक पूर्ण केलं.
अर्धशतकानंतर सूर्या चांगलाच रंगात आला होता. तो 57 धावांवर खेळत होता. पण यानंतर सूर्यकुमारला थर्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. सूर्याला पंचांनी नॉट आऊट असतानाही बाद घोषित केलं. त्यामुळे सूर्याला मैदानाबाहेर जावे लागले. सुर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली.
Talk about making a cracking start! ??
DO NOT MISS: @surya_14kumar opens his run-scoring account in international cricket in some style! ?? #TeamIndia @Paytm #INDvENG
Watch SKY's sensational first-ball SIX ? ?https://t.co/8R96Wg67cm pic.twitter.com/hUqb0XAwmn
— BCCI (@BCCI) March 18, 2021
सामनावीर पुरस्काराने गौरव
सूर्यरकुमारने केलेल्या शानदार खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सूर्याने अर्धशतकी खेळीसह एकूण 2 कॅचही घेतल्या. जेसन रॉय आणि बेन स्टोक्स या फंलदाजांची कॅचही सूर्याने घेतली.
मालिकेत 2-2 ने बरोबरी
टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
सूर्य तळपला ! इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक
(india vs england 4th t20i suryakumar yadav revils secret about first international ball on six)