6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने इंग्लंडचा चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20i) थरारक विजय मिळवला. शार्दुल ठाकूर (shardul thakur) या सामन्याचा हिरो ठरला.
अहमदाबाद : टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय (India vs England 4th T20i) मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 177 धावाच करता आल्या. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या विजयाचा शिल्पकार ठरला. शार्दुलने एकूण 3 विकेट्स घेतल्या. (india vs england 4th t20i thrill of the last over of shardul thakur bowling)
शेवटच्या ओव्हरचा थरार
इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता होती. मैदानात जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन खेळत होते. कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्यामुळे रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्वाची सर्व सूत्र होती. रोहितने शार्दूलला शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिली. शार्दुल ओव्हर टाकायला आला.
सामन्यातील शेवटची ओव्हर
शार्दुलच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनने एक धाव घेतली. स्ट्राईकर एंडवर जोफ्रा आर्चर आला. शार्दुलने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने खणखणीत चौकार लगावला. त्यामुळे इंग्लंडला आता विजयासाठी 4 चेंडूत 18 धावांची गरज होती. जोफ्राने तिसऱ्या चेंडूवर अफलातून षटकार खेचला. टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये टेन्शन दिसून येत होतं. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड आनंदी होती. जोफ्राच्या षटकारामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा वाढल्या. इंग्लंडला आता विजयासाठी 3 चेंडूत 12 धावांची गरज होती.
सामना रंगतदार स्थितीत
2 सिक्स किंवा 3 चेंडूत 3 चौकार असं विजयाचं समीकरण होतं. शार्दुलने 2 चेंडूत 10 धावा लुटल्या होत्या. त्यामुळे तो दबावात होता. तर जोफ्राचा विश्वास दुणावला होता. त्यानंतर रोहित आणि हार्दिकने शार्दुलसोबत चर्चा केली. शार्दुल चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला. शार्दुलने चौथा चेंडू वाईड टाकला. शार्दुलवर असलेला दबाव स्पष्टपणे दिसून येत होता. इंग्लंडला आता 3 चेंडूत 11 धावा हव्या होत्या. शार्दुलने पुन्हा एकदा वाईड बोल टाकला.
Still in yesterday's hang over ? ?@ImRo45 #RohitSharma pic.twitter.com/h7S1jxBjzI
— Rohit Stans Telugu (@Rohit_Stans) March 19, 2021
हृदयाचे ठोके वाढले
यामुळे सर्व भारतीय चाहत्यांची धडधड वाढू लागली होती. सामना गमावतो की काय स्थिती निर्माण झाली. इंग्लडला आता 3 चेंडूत 10 धावा हव्या होत्या. शार्दुलने चौथा चेंडू व्यवस्थित टाकला. यावर आर्चरने एक धाव घेतली. सर्वांच्या जीवात जीव आला. आता 2 बोलमध्ये हव्या होत्या. 9 धावा. ख्रिस जॉर्डन स्ट्राईकवर होता. शार्दुलने टाकलेल्या 5 व्या चेंडूवर ख्रिस आऊट झाला. भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला 9 धावांची गरज होती. जोफ्रा स्ट्राईकवर होता. पण यावेळेस शार्दुलने चूक केली नाही. शार्दुलने हा चेंडू डॉट टाकला. यासह भारताचा अंतिम ओव्हरमध्ये थरारक विजय झाला.
रोहित शर्माची शानदार कॅप्टन्सी
विराटला सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात काही ओव्हरआधी मैदानाबाहेर गेला. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी उपकर्णधार असलेल्या रोहितला मिळाली. सामना ऐन रंगात होता. बेन स्टोक्स आणि कर्णधार इयोन मॉर्गन आक्रमक जोडी मैदानात खेळत होती. इंग्लंडने 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 140 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी 24 चेंडूत 46 धावांची गरज होती. स्टोक्सने 22 चेंडूत 46 धावा चोपल्या होत्या.
रोहितचा मास्टरप्लान आणि सेट जोडीचा गेम ओव्हर
ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. रोहितने शक्कल लढवली. त्याने 17 वी ओव्हर शार्दुलला करायला सांगितली. तुझ्या शैलीनुसार गोलंदाजी कर, असा सल्ला रोहितने शार्दुलला दिला. शार्दुलने रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. शार्दुलने सलग 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतल्या. शार्दुलने पहिल्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करत असलेल्या स्टोक्सला आऊट केलं. स्टोक्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने थेट सूर्यकुमार यादवला गाठलं. सूर्याने अचूक कॅच घेतला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इयोन मॉर्गनचा काटा काढला. मॉर्गनने मारलेला फटका वॉशिंग्टन सुंदच्या दिशेने गेला. सुंदरनेही अतिसुंदर कॅच टिपला. हा क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला. यामुळे रोहितच्या कॅपटन्सीचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.
#RohitSharma – The Best Captain under Pressure!
Agree it or Die? #INDvsENG #Hitman pic.twitter.com/kK9LmesiqM
— Harsh Dubey (@_harshdubey) March 19, 2021
रोहितला कर्णधार करण्याची नेटीझन्सची मागणी
रोहितच्या अफलातून नेतृत्वामुळे त्याला टी 20 कर्णधार करा, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. रोहितच्या नेतृत्वाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. तसेच रोहितला कर्णधार करण्याच्या समर्थनार्थ अनेक ट्विट करण्यात येत आहेत. याआधी आयपीएलच्या 13 व्या मोसमादरम्यान विराटऐवजी रोहितला टीम इंडियाच्या टी 20 टीमचा कर्णधार करा, अशी मागणी जोर धरु लागली होती. तसेच खुद्द गौतम गंभीरनेही याबाबत वक्तव्य केलं होतं.
Captain leader @ImRo45 ?#RohitSharma #Hitman #INDvEND pic.twitter.com/7Ceq3a3eMu
— HITMAN ROCKY ?? ? (@HITMANROCKY45_) March 18, 2021
रोहित आणि विराटची नेतृत्वातील कामगिरी
विराट 2017 पासून टी 20 मध्ये नेतृत्व करतोय. त्याने आतापर्यंत 44 सामन्यांपैकी 26 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर 14 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. 2 सामने हे टाय झाले आहेत. तर 2 मॅच अनिर्णित राहिले. तसेच रोहित शर्माने 2017-2020 दरम्यान एकूण 19 टी 20 मॅचेसमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यापैकी 15 सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला आहे. तर 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आकडेवारीच्या बाबतीतही रोहित विराटपेक्षा वरचढ आहे.
संबंधित बातम्या :
4 ओव्हरसाठी कॅप्टन्सी केली, गेलेला सामना परत आणला, हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव
(india vs england 4th t20i thrill of the last over of shardul thakur bowling)