IND vs ENG | टीम इंडियाला सीरिज लॉक करण्याची संधी, चौथा सामना केव्हा?

India vs England 4th Test Live Streaming | इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनही जाहीर केली आहे. जाणून घ्या चौथ्या सामन्याबाबत.

IND vs ENG | टीम इंडियाला सीरिज लॉक करण्याची संधी, चौथा सामना केव्हा?
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 4:32 PM

रांची | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात ही पराभवाने झाली. पाहुण्या इंग्लंडने टीम इंडियाचा हैदराबादमधील पहिल्या सामन्यात धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने खातं उघडलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार मुसंडी मारली. टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला. टीम इंडियाने विशाखापट्टणमधील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून पहिल्या पराभवाचा वचपा घेत हिशोब बरोबर केला.

त्यानंतर राजकोटमध्ये तिसरा सामना पार पडला. टीम इंडियाने इंग्लंडवर चौथ्याच दिवशी विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 434 धावांनी मात केली. टीम इंडियाने यासह 2-1 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडियाला चौथा सामना जिंकून सीरिज लॉक अर्थात जिंकण्याची संधी आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे होणार, किती वाजता सुरु होणार, हे सर्वकाही जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना हा 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉमप्लेक्समध्ये खेळवण्यात येणार आहे.

चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीमने सामन्याच्या काही तासांआधी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करत सज्ज असल्याची घोषणा केली आहे. इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. मार्क वूड आणि लेग स्पिनर रेहान अहमद या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर फास्टर बॉलर ओली रॉबिन्सन आणि स्पिनर शोएब बशीर या दोघांची एन्ट्री झाली आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.